Hasan Mushrif claims resolutions as Gokul election equations Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News: भाजपविरोधात मुश्रीफांनी दंड थोपटले! कोल्हापूर, सांगलीत राजकीय बॉम्ब टाकून पश्चिम महाराष्ट्रात सवता सुभा मांडण्याचे संकेत?

Gokul Election 2026: गोकुळमध्ये भाजपला वगळून अन्य घटक पक्षांची सुरू असलेली चाल आणि पुणे पदवीधर मतदारसंघांमधून थेट उमेदवारीची केलेली घोषणा यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप विरोधातच दंड थोपटल्याचे चित्र प्राथमिक दर्शनी दिसत आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघावरून महायुती मधील अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे पदवीधर च्या मतदार संघावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस निर्माण झाले आहे. भाजपकडून पुणे पदवीधर मतदारसंघावर दावा करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवाराची प्राथमिक घोषणा केली आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणुकीच्या रिंगणात अश्वमेध घोडा सोडला असल्याचं जाहीर केला आहे.

गोकुळमध्ये भाजपला वगळून अन्य घटक पक्षांची सुरू असलेली चाल आणि पुणे पदवीधर मतदारसंघांमधून थेट उमेदवारीची केलेली घोषणा यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप विरोधातच दंड थोपटल्याचे चित्र प्राथमिक दर्शनी दिसत आहे. दोन दिवस केलेल्या दोन वक्तव्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रात मंत्री मुश्रीफ हे सवतासुभा मांडणार आहेत की काय? अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषदेत महायुती म्हणून एकत्र असलेल्या महायुतीमध्ये गोकुळ दूध संघ व पुणे पदवीधर निवडणुकीवरून भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शह, कटशहचे राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे मिळून ३५०० मतदार असल्याचे सांगत भाजपाला बेदखल केले.

तर पुणे पदवीधर मतदारसंघात भैया माने यांच्या रुपाने अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडलाय, डिसेंबरमध्ये भैय्या माने यांना आमदार कररू असे सांगत निवडणुकीच्या मैदानात दोन हात करण्याचा इरादा स्पष्ट केला.यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद लाड यांना भाजपमधून उमेदवारी देण्याचे जाहीर केले होते.

महायुतीचे घटक पक्षातील प्रमुख नेते महायुतीचे म्हणून लढणार असे स्पष्ट करत असले तरी भाजपच्या विरोधात गोकुळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व जनसुराज्यकडून अंतर्गत कुरघोड्या सुरु आहेत. हे आता लपून राहिलेले नाही. दरम्यान गोकुळच्या अवसायानातील अपात्र संस्थेवरुन राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये पडद्याआड कुरघोडीचे राजकारण रंगले. जाहीरपणे मंत्री मुश्रीफ अदृश्य शक्तीचे नाव घेत नसलेले तरी त्यामागे कोण आहे. हे ठामपणे मंत्री मुश्रीफ यांना माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रावादी पुरुस्कृत 1400 संस्थाचा मेळावा अदृश्य शक्तीच्या विरोधात घेऊन अप्रत्यक्षपणे नाराज सभासद विरोधकांकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढू असे सांगत असताना गोकुळच्या महायुतीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य यांची बेरीज केली. या तीन पक्षाकडे ३५०० ठराव असल्याचा दावा करत 'भाजप'ची गरज नाही दाखवून दिले. मंत्री मुश्रीफ यांच्या विधानाचा अर्थ शोधला तर गोकुळमध्ये 'राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती' हीच महायुती. असा निघतो. त्यामध्ये भाजपचे स्थान किती हा प्रश्न शिल्लक आहे. म्हणजे एकप्रकारे त्यांनी भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न करत गोकुळमध्ये सवता सुभा मांडण्याचा डाव आखला जात आहे. अशी चर्चा सुरु आहे.

तर दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आमदार शरद अण्णा लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांचा भाषेमध्ये पक्ष प्रवेश केला. उमेदवारीचा शब्द घेऊन शरद लाड यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या पक्षीय पातळीवर पदवीधर नोंदणी सुरू आहे.

मंत्री हसन व शरीफ यांच्याकडून भैया माने यांनी जवळपास जिल्ह्यातून 90 हजार नोंदणी केल्याचा दावा केला जात आहे तर भाजपकडून सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदणी 40,000 झाल्याचा दावा करण्यात येत आहे तर लाड यांच्याकडून 80 हजार नोंदणी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

मागील पुणे पदवीधर च्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याला अधिक महत्त्व होते. अशातच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ यांनी सांगलीत जाऊन भैय्या माने यांच्या उमेदवारीची घोषणा करून थेट भाजपलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे पदवीधर च्या निवडणुकीत आपण अश्वमेधचा घोडा सोडला असून त्याला भाजप ही थांबवू शकणार नाही असं वक्तव्य करून थेट स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात या घडामोडी मुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष हा राज्यपातळीवर पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता आहे.

सांगलीत नेमकं काय झालं?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. यां मेळाव्यात पुणे पदवीधर मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा केला आहे. मागील पदवीधर निवडणुकीत आता मी लढतो, पुढच्यावेळी तुम्ही लढा’, अशी ग्वाही त्यावेळी आमदार अरुण लाड यांनी आमच्यासमोर दिली होती. आता त्यांनी शब्द पाळायला हवा.त्यांनी आता मुलाची समजूत काढावी असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

राष्ट्रवादीचा अश्वमेध यज्ञाचा घोडा आता सुटला आहे. तो थांबणार नाही. भाजपदेखील त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही.कादीर असे थेट सांगत भाजपालाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे भैय्या माने लढतील, हे यापूर्वी स्पष्ट केले आहे. भाजपने ही जागा मागितली तरी आम्ही देणार नाही. त्यांना समजून सांगू. यावेळचा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार कोण असेल हे लक्षात आल्यानेच शरद लाड यांनी भाजपचा रस्ता धरला. असे म्हंटले आहे.

कोल्हापुरात काय बोलले?

सर्वोच्च न्यायालय, सर्किट बेंचमध्ये संस्थांना आम्ही पाठबळ दिले, आमच्या खांद्यावर बसून आमदार सतेज पाटील तिथे गेले. संस्थांनी सहा महिने जो संघर्ष केला, न्यायालयीन लढा दिला, त्यात त्यांचे एक टक्काही योगदान नाही. संस्थांची सहानुभूती मिळवण्यासाठी आता ते त्यांना पाठबळ देण्याचे सांगत आहेत, असा टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावत त्यांनी भाजपला देखील अप्रत्यक्षपणे इशारा दिला. शिवसेना, जनसुराज्य, राष्ट्रवादीकडे एकत्र साडेतीन हजार ठरावधारक आहेत.उर्वरित हे काँग्रेस व अन्य काही जणांचे सांगत थेट भाजपला महायुतीतून डावलण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT