MH SET 2026 : एमपीएससी, यूपीएससीच्या अडथळ्यानंतर सेट परीक्षा अखेर २५ ऑक्टोबरला होणार, सलग तिसऱ्यांदा तारीख बदलली

Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी घेण्यात येणारी ४१ वी महाराष्ट्र-गोवा राज्य पात्रता परीक्षा (सेट) पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.
SET Exam 2026 date announced
SET Exam 2026 date announcedSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी घेण्यात येणारी ४१ वी महाराष्ट्र-गोवा राज्य पात्रता परीक्षा (सेट) पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तिसऱ्यांदा परीक्षेची तारीख बदलण्यात आली असून, आता ही परीक्षा २५ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परीक्षार्थींचे हित आणि परीक्षा सुरळीतपणे आयोजित करण्यातील सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो उमेदवारांना पुन्हा नव्याने नियोजन करावे लागणार आहे.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सेट परीक्षा २६ जुलै रोजी होणार होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तसेच आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलून ६ सप्टेंबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते.

दरम्यान, ६ सप्टेंबर रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) सीटीईटी परीक्षा होणार असल्याचे समोर आल्यानंतर सेट परीक्षेची तारीख पुन्हा बदलण्यात आली. त्यानंतर २७ सप्टेंबर ही नवी तारीख जाहीर करण्यात आली होती.

SET Exam 2026 date announced
Dhananjay Munde News: मोठी बातमी: परळीत जनता दरबार सुरू असतानाच धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मात्र, २७ सप्टेंबरच्या आसपास केंद्रीय लोकसेवा आयोगासह (यूपीएससी) अन्य स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक असल्याने परीक्षार्थींना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यातच २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने गणेशोत्सवानिमित्त होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि विविध भागांतून परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांचा प्रवास याचा परिणाम परीक्षा व्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर सेट परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करणारी निवेदने विद्यापीठाकडे प्राप्त झाली होती. परीक्षार्थींच्या मागणीचा विचार करून अखेर विद्यापीठाने परीक्षा २५ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

SET Exam 2026 date announced
Punjab Politics Updates : युतीच्या चर्चेदरम्यान राजकीय पक्षाला झटका, माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश; पंजाबच्या राजकारणात भूकंप

त्यामुळे आता ४१ व्या सेट परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना २५ ऑक्टोबरची तारीख लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करावे लागणार आहे. परीक्षेची सुधारित तारीख जाहीर झाल्याने परीक्षार्थींच्या तयारीला पुन्हा वेग येण्याची अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com