Internal discussions in NCP Ajit Pawar group about reunification Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif: विलिनीकरणाच्या चर्चांना हसन मुश्रीफांचा दुजोरा; अजित पवार नेमकं काय म्हणाले होते? स्पष्टच सांगितलं

Hasan Mushrif confirms Ajit Pawar's stand on NCP merger: अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.

Amit Ujagare

Impact of Ajit Pawar's death on NCP merger possibilities: अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडून यावर मौन बाळगण्यात येत आहे पण दुसरीकडं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र याबाबत खुद्द अजित पवारांनीच बैठक घेतल्याचं सांगतलं जात आहे. या सर्व गोंधळाच्या वातावरणात आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र सूचकपणे या विलिनीकरणावर भाष्य केलं आहे. अजित पवार आपल्याकडं याबाबत नेमकं काय म्हणाले होते? हे त्यांनी सांगितलं आहे.

मुश्रीफ म्हणाले की, दुर्दैवाने अजितदादांचं विमान अपघातात निधन झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आम्ही पोरके झालो आहोत, ही हानी आयुष्यात कधीही भरून काढू शकत नाही. पण त्याचसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदासाठी राजी झाल्या आणि चौथ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध ठेवणं, त्याचा विस्तार करणं, कार्यकर्त्यांना आधार देणं आणि पोरकेपणाची जाणीव होऊ न देणं, अशा पद्धतीने त्यांनी काम सुरू केलं आहे याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. डोंगराएवढं दुःख बाजूला ठेवून कार्यकर्त्यांसाठी पुढे येणं, हे महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचं विलिनीकरण

दरम्यान, विलिनीकरणाच्या चर्चांवर बोलताना मुश्रीफ म्हणाले, "दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसंच शरद पवार साहेबांनी देखील भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हटलं आहे. याला जोडूनच मुख्यमंत्री म्हणाले अजितदादा सरकारमधून बाहेर पडणार होते का? याबाबत भारतीय जनता पार्टीबरोबर बोलणी झाली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे.

पण नगरपालिका, कुणाला घड्याळ लढायचं असेल किंवा कुणाला तुतारीवर लढायचं असेल, तर त्यांनी लढा, असा स्पष्ट संदेश अजितदादांनी दिला होता. जयंत पाटलांनी देखील मला सांगितलं होत की, अजितदादा आणि त्यांची विलिनीकरणाबाबत चर्चा झालेली आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजितदादांचं दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याबाबतचं वक्तव्य मी ऐकलं. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे हे प्रश्न देखील आता अनुत्तरीत राहिले आहेत, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT