Kolhapur Politics  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : जसं आघाडीचं तत्व, महायुतीही तशीच वागणार; मुश्रीफांचा पाटलांना जशास तसा टोला!

Hasan Mushrif Vs Satej Patil : भाजपच्या आरोपांवर मुश्रीफांची कबुली? काय म्हणाले पालकमंत्री?

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या वतीने काँग्रेस आमदारांना निधी वाटपात दुय्यम स्थान मिळत असल्याचे म्हणत, आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हा नियोजन समितीवर सडाडून टीका केली होती. पाटलांच्या या टिकेवर आज मुश्रीफ यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. जिल्हा नियोजन निधी वाटपामध्ये महाविकास आघाडीचे जे तत्व होतं तेच तत्व महायुतीत आहे, अशा शब्दात मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे. जिल्हा नियोजन निधीच्या वाटपात तीन पक्षांच्या नियोजन मंडळात ठरलेल्या फॉर्मुल्याप्रमाणेच वाटप होत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. (Latest Marathi News)

संजय शिरसाट यांच्यावर भाष्य -

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्या बद्दल जे वक्तव्य केलेले आहे. त्या वक्तव्याबद्दल संजय शिरसाठ यांनाच विचारलं पाहिजे. याबद्दल मला अधिक काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारावरून बोलताना, भरत गोगावलेंना आमच्या शुभेच्छा आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाच अधिक माहिती असेल, आम्हाला याबाबत काहीही माहिती नाही. 2024 हे निवडणुकांचे वर्ष आहे. त्यामुळे जनतेने आता आमच्याकडे लक्ष द्यावं. या नवीन वर्षात सर्व जनता, मतदार, शेतकरी यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असेही मुश्रीफ म्हणाले.

भाजपच्या आरोपांवर मुश्रीफांची कबुली -

जिल्हा नियोजन समिती वरून बऱ्याचदा राजकीय वाद उफाळून आले आहेत. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या काळात ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कमी निधी मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र मुश्रीफांनी महाविकास आघाडीचे जे तत्व होतं, तेच महायुतीत आहे, असे बोलून त्याला कबुलीच दिले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT