Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : 'महायुतीच्या उमेदवारासाठी हाडाची काडं अन् रक्ताचं पाणी करेल!'

Hasan Mushrif Kolhapur Loksabha News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जो उमेदवार असेल. त्याच्यासाठी मी महायुतीच्या उमेदवारासाठी हाडाची काडं अन् रक्ताचं पाणी करेल. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे सूचक विधान.

Rahul Gadkar

Kolhapur Loksabha Election Politics : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित असल्याचे समजल्यानंतर महायुतीने समरजीतसिंह घाटगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याचे समोर आले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत असताना पालकमंत्री मुश्रीफ यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सूचक विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपकडून समरजीतसिंह घाटगे Samarjitsingh Ghatage Patil यांच्या उमेदवारीवरून बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी तिन्ही पक्ष मिळून उमेदवाराबाबत जो निर्णय घेतील, त्याच्यामागे ठामपणे उभा राहणार. समरजीतसिंह घाटगे यांच्या संभाव्य उमेदवारीवर हसन मुश्रीफ यांनी सूचक विधान करत 'महायुतीच्या दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी हाडाचं काडं रक्ताचे पाणी करेन. कोण उमेदवार दिला जाणार, याबाबत मला माहिती नाही. मात्र, जो उमेदवार देतील त्याचा मला प्रचार आणि नेतृत्व करावं लागेल. दुसरं काही करण्याचा आमचा स्वभाव नाही. आज तर आमच्या डोळ्यांसमोर संजय मंडलिक Sanjay Mandlik हेच उमेदवार असल्याचे' मुश्रीफ यांनी सांगितले.

दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ Hasan Mushrif यांच्या वक्तव्यावर माजी पालकमंत्री आणि आमदार सतेज पाटील शाहू महाराज यांच्याबद्दल आदर असेल तर बिनविरोध करा. असे आव्हान मुश्रीफ यांना केले होता. त्यावर आज मुश्रीफ यांनी सतेज पाटलांवर निशाणा साधला. सतेज पाटील यांना इतका बालिशपणा कुठून आला हे समजत नाही. राजकारणामध्ये असं होत नसतं. आम्ही आदराच्या भावनेने शाहू महाराज यांच्याबद्दल बोललो होतो. आमच्या श्रद्धेला कुठेही डाग लागू नये ही आमची त्या पाठीमागची भावना होती, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

मंडलिक यांनीही साधला सतेज पाटलांवर निशाणा

माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील Satej Patil यांनी शाहू महाराज यांचा आदर आहे, तर बिनविरोध करा, असे आव्हान दिल्यानंतर खासदार मंडलिक यांनी त्यांचा समाचार घेतला. सतेज पाटलांनी सर्वच जागावरील लिस्ट द्यावी. आम्ही बिनविरोध करतो. ही निवडणूक जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूक नाही, अशा शब्दांत सुनावले.

Edited by: Rashmi Mane

R

SCROLL FOR NEXT