Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif on Loksabha election : सात टप्प्यांत होणार लोकसभा निवडणूक..! हसन मुश्रीफ म्हणाले, 'लागा कामाला...'

Meeting of office bearers at NCP office : कोल्हापूर बाजार समिती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक.

Rahul Gadkar

Kolhapur News : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांना माहिती देताना त्यांनी लोकसभेची निवडणूक केव्हा आणि किती टप्प्यात होणार ? हे सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Hasan Mushrif on Loksabha election)

लोकसभा निवडणूक सात टप्‍प्यांत होणार आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच आचारसंहिता जाहीर केली जाऊ शकते, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. बाजार समिती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने काम करावे, याबाबत मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, ‘‘लोकसभा आणि विधानसभेसाठी लवकरच आचारसंहिता लागू होईल. देशात सात टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याची आमच्यापर्यंत माहिती आहे. तीन ते चार महिने निवडणुकीत जाणार आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत’,’ असे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस क्रमांक एकचा पक्ष बनण्यासाठी करवीर आणि हातकणंगले तालुक्यात जास्तीत जास्त निधी देऊन सदस्य संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. ‘‘जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळतात; पण राष्ट्रवादीमुळेच त्यांचा अध्यक्ष होतो. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात आपण कमी पडत आहोत.

या दोन्ही तालुक्यात जास्तीत जास्त निधी दिला पाहिजे. यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावरच राहत आहे. आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील - आसुर्लेकर, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आदिल फरास उपस्थित होते.

(Edited By Amol Sutar)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT