Shahu Maharaj- Sujit Chavan-Sambhaji Raje  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jarange Patil Kolhapur Sabha : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने ‘राजेंना' डिवचलं; ‘राजे’गटाकडूनही सडेतोड प्रत्युत्तर!

Rahul Gadkar

Kolhapur News : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची कोल्हापुरात नुकतीच सभा झाली. या सभेला श्रीमंत शाहू महाराज आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. त्यावरून आता कोल्हापूर शहरातील राजकारण पेटले आहे. व्यासपीठावर छत्रपती कुटुंब असल्याने त्यावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुखांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याला आता स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकातून उत्तर दिले आहे. (How about Shahu Maharaj, Sambhaji Raje on stage at Manoj Jarange Patil's Sabha? : Shinde group)

जरांगे पाटील यांच्या दसरा चौक येथील सभेला व्यासपीठावर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला बसविले जाणार नाही, असे सकल मराठा समाजातर्फे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित श्रीमंत शाहू छत्रपती व स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती व्यासपीठावर उपस्थित कसे? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काही पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना काहीच काम नाही. तसेच, मराठा आरक्षणाच्या चळवळीतही कोणतीच संधी मिळत नाही. या नैराशातूनच श्रीमंत शाहू छत्रपती व संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका करत आहे, असे प्रत्युत्तर स्वराज्य पक्षाचे नेते, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय पोवार व पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख राहुल शिंदे यांनी रविवारी पत्रकाद्वारे सुजित चव्हाण यांचे नाव न घेता दिले.

त्याला स्वराज पक्षातर्फे पत्रकाद्वारे प्रत्युत्तर देण्यात आले. पत्रकात म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी केलेले कार्य पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केले आहेत. आझाद मैदानावर उपोषण केले आहे. आरक्षणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व त्यांनी वेळोवेळी केले आहे. हे सर्व मनोज जरांगे पाटील यांना माहीत आहे. त्यामुळेच जरांगे पाटील यांनी स्वतःहून सर्व उपस्थितांसमोरच श्रीमंत शाहू छत्रपती व संभाजीराजे यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली.

जरांगे पाटील यांच्या विनंतीला मान देऊन ते दोघेही व्यासपीठावर बसले होते. जरांगे पाटलांचे बेमुदत उपोषण सुरू असताना रात्रभर प्रवास करून संभाजीराजे अंतरवलीला जाऊन त्यांची भेट घेतली होती. ते कायमच जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले. जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी व अंतरवली येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार झाला, त्यावेळी हे जिल्हाप्रमुख कोठे होते? तसेच मराठा आरक्षण चळवळीत जिल्हाप्रमुखांचे योगदान काय? ज्याच्यामुळे त्यांना व्यासपीठावर बसावेसे वाटते, या प्रश्नांची उत्तरे त्यांनी समाजाला द्यावीत आणि खुशाल व्यासपीठावर बसावे, असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT