Bogus Kunbi Registration : बोगस कुणबी नोंदीविरोधात आम्ही कोर्टात जाणार; ओबीसी नेत्याने दिले आव्हान

Prakash Shendge News : काही कुणबी नोंदी ह्या पेनाने लिहिलेल्या आहेत.
Prakash Shendge
Prakash ShendgeSarkarnama

Dharashiv News : बोगस कुणबी नोंदीच्या विरोधात आम्ही न्यायालयात आव्हान देणार असल्याचे माजी आमदार तथा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी धाराशिवमध्ये जाहीर केले. (We will go to court against bogus Kunbi registration : Prakash Shendge)

धाराशिवच्या दौऱ्यावर असलेले प्रकाश शेंडगे यांनी कुणबी दाखल्यावरून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, काही कुणबी नोंदी ह्या पेनाने लिहिलेल्या आहेत. त्या जुन्या नोंदी नाहीत. जिल्ह्यात अस्तित्वात नाहीत, अशाही नोंदी सापडलेल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Shendge
Vijay Wadettiwar News : वडेट्टीवार नरमले; ‘भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही, काँग्रेसची भूमिका घेऊन मी पुढे जाणार’

बोगस कुणबी नोंदीबाबतचे सर्व पुरावे आम्ही गोळा करत आहोत. ते सर्व पुरावे आम्ही सरकारला सादर करणार आहोत. त्या बोगस कुणबी नोंदीच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. मराठा समाजाला पुन्हा पुन्हा मागासवर्गीय करण्याचा घाट घातलेला आहे. सरकारकडून समित्या नेमल्या जात आहेत. या सर्व समित्यांचे अध्यक्ष हे मराठाच नेमले जात आहेत. हे आम्हाला कळत नाही, असा सवालही शेंडगे यांनी केला आहे.

माजी खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेवरही शेंडगे यांनी नाराजी व्यक्त केली. संभाजीराजेंकडे आम्ही आदराने पाहतो. ते शिवरायांचे वंशज आहेत. स्वराज उभारताना आमच्याही पूर्वजांनी रक्त सांडले आहे. त्यामुळे स्वराज्यावर आमचाही अधिकार तितकाच आहे. शिवरायांनी अठरा पगड जमातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. या अठरा पगड जातींचे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही संभाजीराजे यांचीही आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी केवळ गादीचे वारस न होता, विचारांचेही वारस झाले पाहिजे, अशी अपेक्षाही प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केली.

Prakash Shendge
Kartiki MahaPooja : मराठा समाजात अखेर फूट; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या कार्तिकी महापूजेला असणारा विरोध मावळला

मराठा समाजाने ओबीसींमधून आरक्षण मागू नये, अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे. हे गरिबांचे आरक्षण आहे, मराठा समाज ताकदवान आहे. शक्तीशाली आहे. मराठ्यांची राज्यात आणि केंद्रातही सत्ता आहे. ईडब्लूएस हे हक्काचे आरक्षण तुम्हाला मिळालेले आहे. त्यात तुम्हाला साडेआठ टक्के आरक्षण मिळालेले आहे. ते तुम्ही वाढवून घ्या. वेगळा प्रवर्ग करून घ्या. तुमचं आंदोलन हे केंद्र सरकारच्या विरोधात असलं पाहिजे. पण, तुमचं आमच्या विरोधात सगळं चाललं आहे, असेही शेंडगे यांनी स्पष्ट केले.

Prakash Shendge
Solapur Politics : विजयदादांच्या विनंतीवरून इंदिरा गांधींनी बदलला निर्णय...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com