Ramgiri Maharaj-Hussain Dalwai-Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hussain Dalwai : मुख्यमंत्र्यांनी डोकं चालवून काम करावं, असला मुख्यमंत्री चालणार नाही; हुसेन दलवाईंचा हल्लाबोल

विश्वभूषण लिमये

Solapur, 18 August : रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

एखादं विधान करून समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री जर असं वागत असतील, तर त्या मुख्यमंत्र्यांना हटवलं पाहिजे, असला मुख्यमंत्री चालू शकत नाही, शब्दांत दलवाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

माजी खासदार हुसेन दलवाई (Hussain Dalwai) हे सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आले आहेत. सकाळी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दलवाई यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्ला चढवला आहे.

दलवाई म्हणाले, रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा (Eknath shinde) मी निषेध करतो. तसेच, ज्या कोणी महाराजांनी असं विधान केलं आहे, त्या महाराजांनाही अटक केली पाहिजे.

रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवलं पाहिजे, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. रामगिरी महाराज यांना अटक झाली पाहिजे. उद्या कोणी उठलं आणि रामाबद्दल बोलले तर चालेल का..? असा सवालही हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला आहे.

एकमेकांच्या धर्माचा आदर करणारा आपला समाज आहे. ईदच्या वेळी हिंदू समाज मुस्लिम समाजाला शुभेच्छा देतात, तर दिवाळीला मुस्लिम बांधव शुभेच्छा देतात, ही या देशाची परंपरा आणि संस्कृती आहे, असेही दलवाई यांनी सांगितले

या लोकांना आपली संस्कृती बदलायची आहे. एखादं विधान करून समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री जर असं वागत असतील तर त्या मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवलं पाहिजे. असला मुख्यमंत्री चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी काही तरी डोकं चालवून काम करावं, असा घणाघात ही हुसने दलवाई यांनी केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावं, या मागणीसाठी हुसेन दलवाई राज्यभर दौरा करत आहेत. सोलापूरमध्ये आल्यानंतर दलवाई यांनी पत्रकार परिषदेत हे विधान केले आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT