Udayanraje Bhosale, Ajit Pawar
Udayanraje Bhosale, Ajit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : मी आव्हानांना भीक घालत नाही : उदयनराजेंचा अजितदादांना टोला

Umesh Bambare-Patil

Udayanraje Bhosale News : प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढविण्याची जबाबदारी असते त्यातून ते विधाने करतात, त्यात गैर काय. राष्ट्रवादीच काय उद्या कम्युनिस्ट पक्षाचे लोक म्हणतील. तसेच भाजपच्या लोकांनाही वाटते की आपला खासदार व्हावा, ही चांगली गोष्ट आहे. पण, यातून कोणी आव्हान दिले तर मी आव्हानांना भीक घालत नाही. आव्हान कोणाचे स्वीकारायचे हे मीच ठरवतो, असा टोला खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी अजितदादांना Ajit Pawar लगावला.

विरोधी पक्ष नेते अजित पवार काल (रविवारी) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी २०२४ मध्ये सातारचा खासदार व आमदारही राष्ट्रवादीचा असेल असे वक्तव्य केले होते. याबाबत खासदार उदयनराजेंना विचारले असता त्यांनी हा चांगला विचार आहे, असे म्हणत त्या वक्तव्याचे स्वागत केले. पण, यातून कोणी मला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेलतर मी आव्हानाला भीक घालत नाही, असे प्रतिउत्तरही त्यांनी दिले.

उदयनराजे म्हणाले, समाजकारण असू अथवा राजकारण प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते. आपण जर व्यापकपणे विचार केला नाही, तर पुढेच जाऊ शकत नाही. ही तर लोकशाही आहे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. ते काय बोलले असतील. निश्चित चांगले विचार लोकांना दिले असतील.

प्रत्येक नेत्याची आपला पक्ष वाढविणे जबाबदारी असते. त्यातून त्यांनी ही विधाने केली असतील. त्यात काही गैर नाही. आमदार, खासदार होणार असेल तर स्वागत आहे. खासदारकी बाबत बोलायचे झाले तर उद्या कम्युनिस्ट पक्षाची लोक म्हणतील आमचा खासदार हाोईल. भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वाटते आपला खासदार व्हावा, ही चांगली बाब आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांनी हे विचार मांडून तुम्हाला अप्रत्यक्ष आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, मी आव्हानांना भीक घालत नाही. पण, आव्हाने कोणाची स्वीकारायची हे मी ठरवतो. आव्हानांसारखी लांबलचक बुद्धीभेद करणारे शब्द वापरु नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT