Mangalvedha, 31 May : माझ्या सासर आणि माहेरच्या घराला कुस्तीचा वारसा लाभलेला आहे, त्यामुळे पहिलवान हा नेहमी एक डाव राखून कुस्ती खेळत असतो, तोच एक डाव मी देखील राखून ठेवलेला आहे, असा सूचक इशारा पंढरपूरच्या नगराध्यक्षा डाॅ. प्रणिता भालके यांनी दिला. भालके यांचा हा इशारा नेमका कोणाला, अशी चर्चा आता तालुक्यात रंगली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील शिरसा येथील पहिलवान महेंद्र गायकवाड याने हिंद केसरी हा मान मिळविल्यानंतर त्याचा तालुक्याच्या वतीने शिवतीर्थावर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात नगराध्यक्षा प्रणिता भालके (Pranita Bhalke) बोलत होत्या. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ११ लाख रुपये बक्षीस, चांदीची गदा देऊन पहिलवान महेंद्र गायकवाड याचा सन्मान करण्यात आला.
नगराध्यक्षा भालके म्हणाल्या, मीसुद्धा एका पहिलवानाची मुलगी आहे आणि दोन्ही घरांतून मला कुस्तीचा वारसा लाभलेला आहे. (स्व.) भारतनाना भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यातील (Pandharpur-Mangalvedha) कुस्ती क्षेत्राला आश्रय देण्याचे काम केले, याचे साक्षीदार मारुती वाकडे हे आहेत.
महेंद्र गायकवाड हिंद केसरी झाला असून आता महाराष्ट्र केसरी व्हायचे आहे. त्यासाठी नेहमी एक डाव राखून ठेवत असतात, त्यामुळे आपण देखील एक डाव टाकून ठेवल्याचे डॉ. प्रणिता भालके यांनी सांगितले.
डॉ. प्रणिता भालके यांनी राखून ठेवलेला डाव हा राजकीय क्षेत्रासाठी असू शकतो. कारण, भालके यांना विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेला जनाधार हा भविष्यात टिकवण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष प्रणिता भालके या पंढरपुरातील दैनंदिन कार्यक्रम उरकून मंगळवेढातील प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थितीत असतात.
भालके पती-पत्नीने नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना आणि भाजप हे महायुतीत आहेत, त्यामुळे विधानसभेची उमेदवारी ही भाजपलाच निश्चित मानले जात आहे, तर सध्याच्या राजकीय परिस्थितीत विधानपरिषदेसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नावाची चर्चा आहे, त्यामुळे विधान परिषदेच्या उमेदवारीवरच पुढची राजकीय गणितं अवलंबून आहेत, त्यामुळे डॉ. प्रणिता भालके यांनी राखून ठेवलेला डाव हा विधानसभेसाठी तरी नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.