Solapur MLC : सोलापूरच्या भाजप उमेदवारीबाबत मोठी अपडेट : ‘या’ दोन बड्या नेत्यांमध्ये चुरस, जिल्हाध्यक्षांच्या माहितीने उत्सुकता वाढवली

BJP Candidate News : सोलापूर विधान परिषद मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार १ जून रोजी जाहीर होणार असून जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची घोषणा केली जाणार आहे.
Prashant Paricharak-Rajendra Raut
Prashant Paricharak-Rajendra RautSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 31 May : विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी कोणाला असणार, याची प्रचंड उत्सुकता असतानाच मोठी घडामोड पुढे आली आहे. महायुतीच्या उमेदवाराची घोषणा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या (ता. 01 जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास पालकमंत्री जयकुमार गोरे करणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, उमेदवारीसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राजेंद्र राऊत यांच्यामध्ये चुरस असल्याचे भाजपच्या (BJP) गोटातून सांगण्यात आले. त्यामुळे या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात भाजपच्या उमेदवारीची माळ पडणार हे उद्या सकाळी स्पष्ट होणार आहे.

जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण (Shashikant Chavan) म्हणाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष, सर्व मोर्चाचे प्रमुख, तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उद्या सकाळी बालाजी सरोवर येथे बैठक होणार आहे. या बैठकीला पालकमंत्री गोरे, यांच्यासह भाजपचे आजी-माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भाजप उमेदवाराचे नाव निश्चित होईल.

बैठकीनंतर महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत सोमवारी (ता. १ जून) सकाळी साडेदहा वाजता भाजप उमेदवाराचा अर्ज भरण्यात येणार आहे, असेही जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केले. आता उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Prashant Paricharak-Rajendra Raut
Solapur MLC : राजेंद्र राऊतांनी अर्ज घेताच जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाणांची पंढरपूरकडे धाव; प्रशांत परिचारकांशी खलबतं...

भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राजेंद्र राऊत यांच्यात उमेदवारीसाठी चुरस असल्याचे दिसून येत आहे. मात्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत, परिचारक यांनी अजूनही उमेदवारी अर्ज घेतलेला नाही, त्यामुळे भाजपची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार, याचे औत्सुक आहे.

Prashant Paricharak-Rajendra Raut
Satara-Sangli MLC : ‘सातारा-सांगली’त फडणवीसांच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे ट्विस्ट : शेखर गोरेंच्या उमेदवारीबाबत पुन्हा चर्चा

परिचारक, राऊत यांची नावे चर्चेत असली तरी भाजपच्या धक्कातंत्राच्या निर्णयामुळे ऐनवेळी तिसरेच नाव पुढे येऊ शकते. मध्यंतरी काही महिलांची नावे चर्चेत आली होती. मात्र, ती स्पर्धेत कितपत टिकणार, याचीही उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com