Raju Shetti
Raju Shetti sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'विधान परिषदेबाबत मला कोणाचीही ऑफर नाही'

विश्वभूषण लिमये

सोलापूर : विधान परिषदेसंदर्भात (Legislative Council Election) मला कोणत्याही पक्षाकडून कसलीही ऑफर नाही आणि माझी तशी इच्छादेखील नाही. लोकांना वाटत असेल की मी आमदार व्हावे, तर जनतेनीच वर्गणी काढून मला निवडून द्यावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सोलापुरात बोलताना केले. (I have no offer from any political party regarding the Legislative Council: Raju Shetti)

सोलापुरात आलेले माजी खासदार शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी विधान परिषदेबाबत सांगितले. ते म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीसाठी सुरु असलेला घोडेबाजार आणि सौदेबाजीचा एक प्रेक्षक म्हणून सध्या आस्वाद घेतो आहे. विधान परिषदेलाही यापेक्षा वेगळं घडणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेबाबत मला कोणतीही ऑफर नाही आणि माझी इच्छादेखील नाही, असेही राजू शेट्टी यांनी या वेळी सांगितले. शेट्टी यांची महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारकीसाठी शिफारस करण्यात आली होती. मात्र, शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याचे सांगून महाआघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटत आपले मंत्रीमंळडाने शिफारस केलेल्या यादीतून आपले नाव वगळावे, अशी विनंती केली होती.

दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टियूटच्या साखर परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साखरेचा विषय आल्यावर मी उजव्या आणि डाव्या बाजूला पाहतो, त्या ठिकाणी अजित पवार आणि बाळासाहेब थोरात बसलेले असतात, असे सांगितले होते. त्यावरून राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे. तुम्ही मुख्यमंत्री होऊन अडीच वर्षे झाले आहेत. अजूनही तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेच बघत आहात. ते दोघेही साखर कारखानदार आहेत, त्यांना पाहिजे तसेच ते धोरण राबवणार. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले आहे, अजित पवार आणि थोरातांना नाही, याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी ठेवावी, असेही शेट्टी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT