Solapur, 31 March : कर्जत-जामखेड मतदारसंघातून २०२४ मध्ये दुसऱ्यांदा निसटता झालेला पराभव प्रा. राम शिंदे यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच त्यांनी आता २०२९ तयारी सुरू केल्याचे संकेत सोलापुरातील भाषणातून त्यांनी दिले आहेत. मागील निवडणुकीत मी ६२२ मतांच्या फरकाने पडलो. आता जवळ आलंय आणि हातातोंडाशी आलेला घास जेव्हा जातो, तेव्हा आता पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, अशी भावना तयार होते, असे सांगून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी २०२९ मध्ये आरपारची निवडणूक लविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्यानंतर सोलापुरात धनगर समाजाच्या वतीने प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून आगामी २०२९ ची निवडणूक निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. ते सांगताना २०२४ मध्ये अवघ्या ६२२ मतांनी झालेला पराभवा शिंदे यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे.
प्रा. राम शिंदे म्हणाले, एक निवडणूक २०१९ मध्ये झाली, त्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) माझा पराभव झाला. त्यानंतरची दुसरी निवडणूक २०२४ मध्ये झाली, त्या निवडणुकीत ६२२ मतांच्या फरकाने मी पडलो. आता जवळ आलंय आणि हातातोंडाशी आलेला घास जेव्हा जातो, तेव्हा माणसाच्या मनात तीच भावना तयार होते की, आता पुढच्या वेळेस तर मी सोडणार नाही. त्यामुळे मी २०२९ मध्ये निवडणूक लढवायला तयार आहे.
आगामी २०२९ च्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे तुमचा प्रचार करतील का, असा प्रश्न विचारला तेव्हा राम शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माझा प्रचार केला नाही, असं त्यांनीच सांगितलं आहे. आता पुढच्या वेळीस माझा प्रचार करतील की नाही, हे त्या वेळीच ठरेल, असेही प्रा. शिंदे यांनी म्हटले आहे.
सभापती शिंदे म्हणाले, विधान परिषदेचा सभापती झाल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलो होतो. अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथे होणाऱ्या ३०० व्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण पंतप्रधान मोदी यांना दिलं आहे.
मध्य प्रदेश सरकारने महेश्वर येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. त्याच धर्तीवर चौंडी येथे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे. त्यासंदर्भात त्यांची चाचपणी सुरू आहे. चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे, असेही राम शिंदे यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.