माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर हल्ला चढवत लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेल्या प्रचाराची आठवण करून नाराजी व्यक्त केली.
सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप व शेकाप युतीतून त्यांना एकटे पाडल्याने ते भाजपवर सातत्याने टीका करत आहेत.
स्थानिक भाजप नेत्यांनी निवडणूक चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप करत ते सांगोल्यात विजयाचा निर्धार व्यक्त करतात.
Solapur, 20 November : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जर मी ऑपरेशन करायला गेलो असतो, तर कदाचित मी मृत्यूच्या दाढेपर्यंत गेलो नसतो. डॉक्टरांचा सल्ला धुडकावून स्वतःचा जीव पणाला लावून भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा तीन महिने प्रचार केला. माझ्या पोटातील गाठी मोठ्या झाल्या. पण, माझं नशिब चांगलं की, त्या गाठी कॅन्सरकडे जाण्याच्या अगोदर मी हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे कॅन्सरसाख्या गंभीर आजारापासून मी वाचलो, अशा शब्दांत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शेतकारी कामगार पक्षाची युती झाली आहे. शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (ShahajiBapu) यांना एकटे पाडून सांगोल्यात सर्वजण एकत्र आले आहेत. त्यामुळे चिडलेले शहाजीबापू भाजपवर रोज हल्ला चढवत आहेत.
माजी आमदार पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही शब्द मी मोडलेला नाही. लोकसभा निवडणुकीत माझ्या सांगोला तालुक्यातून भाजप (BJP) उमेदवार निंबाळकर यांना पंधरा हजारांचं लीड दिलं आहे. लोकसभेला मोहिते पाटील घराण्यातील उमेदवार उभा होता. अत्यंत बिकट परिस्थिती होती. पण मी रणजितसिंह निंबाळकरसाठी तसेच मित्रपक्षाचा उमेदवार आहे, आपलं कर्तव्य आहे, असं समजून मी माझा जीवसुद्धा पणाला लावला. त्यावेळी मी स्वतःचा विचार केला नाही. ज्याची त्याची नियत ज्याच्या त्याच्याबरोबर.
सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्व पक्षाचे नेते एका बाजूला आणि मी एका बाजूला आहे. राजकारणात काय घडलं आहे, याचं मला दुःख नाही. मला एकट्याने लढण्याची गेली ४५ वर्षांपासून सवय आहे. मी एकटाच लढतो आहे, असे ही शहाजीबापूंनी सांगितले.
ते म्हणाले, शिवसेनेत आल्यापासून मी भारतीय जनता पक्षाबाबत मी कुठेही कोणतीही चूक केलेली नाही. भारतीय जनता पक्षाला माझ्याकडून थोडी कणभर मदत होईल, अशी भूमिका घेत राहिलो आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील भाजप नेत्यांविषयी माझ्या मनात किंचितही वेगळी भावना नाही. पण स्थानिक भाजप आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाताळणाऱ्या भाजपच्या प्रमुखांनी विनाकारण चुका करून ठेवल्या आहेत, असा टोला शहाजी पाटील यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरेंना टोला लगावला.
जयकुमार गोरे यांनी कधी ओबीसी पॅटर्न, कधी समाजाचा पॅटर्न, कधी या घरात जाऊन बसा, कधी त्या घरात जाऊन बसा. भारतीय जनता पक्षात नाही, त्या दीपक साळुंखेंना घेऊन फिरा. कंत्राटदार बाळासाहेब एरंडेला सात मतं नाहीत, त्याला घेऊ फिर. हा सगळा गोंधळ त्यांनी निर्माण केला आहे. सांगोला नगरपरिषदेची निवडणूक मी निश्चितपणे जिंकणार आहे. मला खात्री आहे आणि मी शंभर टक्के जिंकणार आहे, असा दावाही पाटील यांनी केला.
. शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर का नाराजी व्यक्त केली?
→ सांगोल्यातील निवडणुकीत त्यांना एकटे पाडल्यामुळे.
2. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काय भूमिका बजावली होती?
→ भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी जीवावर उदार होऊन प्रचार केला.
3. स्थानिक भाजप नेतृत्वाबद्दल त्यांची तक्रार काय आहे?
→ निवडणूक हाताळताना अनावश्यक गोंधळ आणि चुका केल्याचा आरोप.
4. ते सांगोला नगरपरिषद निवडणुकीबाबत किती आत्मविश्वासू आहेत?
→ ते शंभर टक्के विजयाचा दावा करतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.