NCP and BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Western Maharashtra Survey: पश्चिम महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीत काँटे टक्कर; बडे नेते ‘डेंजर झोन’मध्ये; धक्कादायक निकाल लागणार

सरकारनामा ब्यूरो

News Arena India Survey: ‘न्यूज एरेना इंडिया’ या संस्थेच्या सर्व्हेनुसार पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. यात भाजपला २२ ते २३ तर राष्ट्रवादील काँग्रेसला २३ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीला सर्वाधिक आमदार पुणे आणि सातारा जिल्ह्यातून, तर भाजपला पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (In Western Maharashtra, BJP and NCP are square for the most seats)

राष्ट्रवादीला (NCP) पुण्यातून सर्वाधिक ८, साताऱ्यातून सहा, कोल्हापुरातून चार, सोलापुरातून तीन, सांगलीतून दोन आमदार मिळण्याची शक्यता आहे. भाजपला पुण्यातून नऊ, सोलापूरमधून पाच, सांगलीतून चार, सातारा दोन आणि कोल्हापूर दोन ते तीन आमदार निवडून येतील, असा हा सर्व्हे सांगतो. भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीनंतर काँग्रेसला नऊ ते दहा, दोन्ही शिवसेनेला प्रत्येकी एक आणि शेकापला एक जागा पश्चिम महाराष्ट्रातून मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) काही जिल्ह्यांत धक्कादायक निकाल हाती येण्याची शक्यता आहे. यात सातारा जिल्ह्यात सर्वांत धक्कादायक निकालाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील फडणवीसांचे कट्टर समर्थक बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे डेंजर झोनमध्ये असल्याचे हा सर्व्हे स्पष्ट करतो. या ठिकाणी ठाकरे गटाची शिवसेना बाजी मारेल, असा अंदाज असून सध्या तरी ठाकरे गटाकडे माजी मंत्री दिलीप सोपल हेच सर्वाधिक ताकदवान उमेदवार आहेत. याशिवाय सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना पराभावाची चव चाखावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोल्हापूरमध्ये पारंपारिक विरोध पाटील आणि महाडिक कुटुंबीयांत अटीतटीचा सामना होऊ शकतो. कोल्हापूर दक्षिणमध्ये सर्व्हेतही सतेज पाटील आणि अमल महाडिक यांना ५०-५० टक्के संधी वर्तविण्यात आलेली आहे. यापुढील काळात कोण कसे फासे टाकेल त्यावर येथील विजय निश्चित असणार आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे केवळ दोन आमदार होते. आता निवडणुका झाल्या तर चार आमदार कोल्हापुरात निवडून येतील, असे हा सर्व्हे सांगतो. त्यात चंदगड, राधानगरी, कागड आणि शिरोळ या चार जागांचा समावेश आहे. काँग्रेसच्या मात्र दोन जागा कमी होण्याचा धोका आहे.

पुण्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, इंदापूर आणि वडगाव शेरी हे दोन मतदारसंघ गमावावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इंदापूरचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनाही धोक्याची घंटा वाजविण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा बोलबाला राहील, तर शहरी भागात भाजपचे वर्चस्व दिसून येईल.

सांगलीत आठ जागांपैकी भाजपला चार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी शिराळ्याची जागा हरताना दिसत आहे. जयंत पाटील आणि सुमन पाटील हे दोन आमदार आपल्या जागा राखतील, असे या सर्व्हेतून दिसून येते. शिवसेना खानापूरची जागा हरण्याची शक्यता वर्तविली असून या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी होईल, असे म्हटले आहे.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात राष्ट्रवादीला आठ पैकी सहा जागा मिळतील, तर भाजप दोन जागांवर विजय मिळवेल असे सर्व्हेत म्हटले आहे. याच जिल्ह्यात सर्वाधिक धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

Pune/ Desh Region (58 seats) -

BJP : 22-23

SS : 1

NCP : 23

INC : 9-10

SSUBT : 1

OTH : 1

Kolhapur - BJP :2-3, SS : 1, NCP : 4, INC : 2-3

271. Chandgad : NCP

272. Radhanagari : NCP

273. Kagal : NCP

274. Kolhapur South : 50:50

275. Karvir : INC

276. Kolhapur North : SS

277. Shahuwadi : BJP

278. Hatkananhle (SC) : INC

279. Ichalkaranji : BJP

280. Shirol : NCP

Sangli - BJP : 4, NCP : 2, INC : 2

281. Miraj (SC) : BJP

282. Sangli : BJP

283. Islampur : NCP

284. Shirala : BJP

285. Palus Kadegaon : INC

286. Khanapur : BJP

287. Tasgaon : NCP

288. Jath : INC

Satara - BJP : 2. NCP : 6

255. Phaltan(SC) : NCP

256. Wai : NCP

257. Koregaon : NCP

258. Man : NCP

259. Karad North : NCP

260. Karad South : BJP

261. Patan : NCP

262. Satara : BJP (Extremely strong candidate )

Solapur- BJP : 5, SSUBT : 1, NCP : 3, INC : 1, OTH : 1

244. Karmala : NCP

245. Madha : NCP

246. Barshi : SSUBT

247. Mohol (SC) : NCP

248. Solapur City North : BJP

249. Solapur City South : INC

250. Akkalkot : BJP

251. Solapur South : BJP

252. Pandharpur : BJP

253. Sangola : PWPI

254. Malshiras (SC) : BJP

Pune - BJP : 9, INC : 4, NCP : 8

195. Junnar : NCP

196. Ambegaon : NCP

197. Khed Alandi : NCP

198. Shirur : NCP

199. Daund : BJP

200. Indapur : BJP

201. Baramati : NCP

202. Purandar : INC

203. Bhor : INC

204. Maval : NCP

205. Chinchwad : BJP

206. Pimpri (SC) : NCP

207. Bhosari : BJP

208. Vadgaon Sheri : BJP

209. Shivajinagar : INC

210. Kothrud : BJP

211. Khadakwasla : BJP

212. Parvati : BJP

213. Hadapsar : NCP

214. Pune Cantonment (SC) : INC

215. Kasba Peth : BJP

In Pune, tactical alliance with MNS might help BJP.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT