Panchagani Police sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Panchgani : मुख्याधिकाऱ्यांवर शाई फेकली; महाबळेश्वर, पाचगणीत कर्मचाऱ्यांचे कामबंद

याबाबत मुख्याधिकारी Co गिरीश दापकेकर Girish Dapkekar यांनी पाचगणी Panchgani पोलिस ठाण्यात Police station अनमोल कांबळे यांच्याविरोधात शासकीय कामांत अडथळा आणून हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल Filed a case केला.

रविकांत बेलोशे

भिलार : पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर आज सकाळी बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत असताना बुधवार बाजारपेठेत त्यांच्या अंगावर शाई टाकून हल्ला केल्याची घटना घडली. याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ महाबळेश्वर, पाचगणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.

याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, आज सकाळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर हे रोटरी क्लबच्या रक्तदान शिबिरात उपस्थित राहून त्यांनी रक्तदानकेले. त्यानंतर आठवडा बाजारात राष्ट्रीय शहरी उपजिवीका अभियानांतर्गत पथविक्रेते सर्वेक्षणाचे काम व बाजारातील स्वच्छतेची पहाणी करण्यासाठी गेले.

त्यांच्या समवेत बांधकाम मुकादम सुर्यकांत कासुर्डे ,स्वच्छता निरीक्षक गणेश कासुर्डे, लिपीक रवींद्र कांबळे व सागर बगाडे, शिवाजी चौकात आले. सर्वजण पथविक्रेते सर्वेक्षण तसेच बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत निघाले होते. महात्मा फुले हायस्कुलची जुन्या इमारतीच्या गेट जवळ पोहोचले.

त्यावेळी अचानक अनमोल अशोक कांबळे (रा. पाचगणी) यांने समोर येऊन मुख्याधिकारी यांना अडवून मला नोटीस का काढणार आहात, असे विचारून मुख्याधिकाऱ्यांचा यांचा हात पकडुन धक्का दिला. त्यामुळे ते खाली पडले. त्यावेळी त्याने हातातील बाटलीतील शाई मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर टाकली.

या घटनेची माहिती मिळताच सर्व पालिका कर्मचारी कार्यालयात जमा झाले. यावेळी काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यांनतर मुख्याधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत पोलिस ठाण्यात गेले. कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेचे काम बंद ठेवून सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांना निवेदन देवून वारंवार कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या या व्यक्तीमुळे कामकाज करणे असुरक्षित झाले आहे.

तरी याचा तातडीने बंदोबस्त करावा व त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. याबाबत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात अनमोल कांबळे यांच्याविरोधात शासकीय कामांत अडथळा आणून हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती समजताच महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, वाईचे मुख्याधिकारी किरण मोरे यांच्यासोबतच पाचगणी शहर व परिसरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक हे पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत मुख्याधिकाऱ्यांना पाठींबा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT