Jabbar Patel On Shahu Maharaj  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jabbar Patel : जब्बार पटेलांनी राज्यकर्त्यांना धु धुतले; अधिकारी व नेत्यांकडे सही करायला वाघ घेऊन जायचे का?

Jabbar Patel On Shahu Maharaj Jayanti : शाहू महाराज यांच्यात पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा मिलाप होते. राज्य काय असते हे कळायचं असेल तर सगळ्यात आधी माणुसकी कळायला पाहिजे. आता किती मंत्री आहेत? किती अधिकारी आहेत? पण त्या काळी एकच कॅबिनेट होते ते म्हणजे शाहू महाराज.

Rahul Gadkar

Kolhapur News : आरक्षणाच्या फाईलवर ब्रिटिश गव्हर्नरचा पंतप्रतिनिधी सही करत नव्हता. महाराजांनी त्या पंतप्रतिनिधी बोलावून घेतले. युक्तीचा उपयोग करत त्यावेळी शाहू महाराज यांनी वाघाच्या पिल्लाचे भय दाखवून सही करून घेतली होती. पण आत्ताच्या काळात आम्ही काय सरकारी कार्यालय आणि मंत्र्यांकडे वाघ घेऊन जायचे काय? मला कोणत्याही अधिकारी, नेत्याचा अपमान करायचा नाही. कारण मी जे विचार सांगितले ते शाहू महाराजांचे आहेत. तो विचार, माणुसकी आणि समाजाची सेवा हे प्रत्येकानं जपले पाहिजे असे परखड मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. ते राजर्षी शाहू पुरस्कार सोहळ्यात सत्कारप्रसंगी कोल्हापुरात बोलत होते.

शाहू महाराज यांच्यात पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा मिलाप होते. राज्य काय असते हे कळायचं असेल तर सगळ्यात आधी माणुसकी कळायला पाहिजे. आता किती मंत्री आहेत? किती अधिकारी आहेत? पण त्या काळी एकच कॅबिनेट होते ते म्हणजे शाहू महाराज. ज्यांनी आता कामे केली त्यांची राजकारणात भले भले पोस्टर लागतात, तसे त्यावेळी देखील शाहू महाराज यांना करता आलं असतं, असा खोचक टोला जब्बार पटेल यांनी लगावला.

मला अनेक पुरस्कार मिळाले, पण हा पुरस्कार खरंच वेगळा पुरस्कार आहे. इथला कोणताही माणूस शाहू महाराज याचं देणं विसरू शकत नाही. संविधानात शाहू महाराज यांचे अनेक विचार आहेत. लोकशाही नसताना लोकशाही पेक्षा सामाजिक आणि मानवी मूल्ये जपणारा राजा या कोल्हापुरात जन्मला. तळागाळातील माणसांशी संबंध जोडायचा आणि त्याला आपलंसं केलं जायचं. शाहू महाराज यांची मूल्ये जपली गेली, कुणी ते विसरली नाहीत.

भारतात आरक्षणाचा मुद्दा कुणाला लक्षात आला नव्हता, पण शाहू महाराज यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं. आज देखील बालविवाह होत असतील. पण त्याकाळी शाहू महाराज यांच्यासमोर किती आव्हाने होती. हे विसरून चालणार नाही, असे मत जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.

कोल्हापूरने जगाला काय काय दिलंय याची कल्पना तुम्हाला नाही. कोल्हापूर हे सिनेमातील एक स्कुल आहे. पण ते पुढं जपलं गेलं नाही. माझा पहिला सिनेमा कोल्हापुरात तयार झाला. भालजी पेंढारकर, लता दीदी माझ्या सिनेमाच्या शुभारंभला उपस्थित होते. माझं कोल्हापूरशी एक वेगळं नातं असल्याचे पटेल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT