Kolhapur Politics : 'महाडिकांच्या' दक्षिणवर 'शिवसेनेची' नजर; भाजप-ताराराणी फोडल्याने महायुतीत छुपा संघर्ष

Kolhapur Politics : भाजपचे अमल महाडिक आमदार असलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघावर मित्रपक्ष शिवसेनेतील राजेश क्षीरसागर यांनी दावा केला आहे. , शारगंधर देशमुख यांच्या प्रवेशानंतर इथे शिवसेनेची ताकद वाढली आहे.
Rajesh Kshirsagar strengthens Shiv Sena’s hold on Kolhapur South seat
Rajesh Kshirsagar strengthens Shiv Sena’s hold on Kolhapur South seatSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : "उत्तरेसोबतच आता दक्षिणवरही भगवा फडकवणार..." कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी नुकताच हा दावा केला. काँग्रेस, भाजप आणि ताराराणी आघाडीतील माजी नगरसेवकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश पार पडताच थेट भाजप आमदार असलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघावरच क्षीरसागर यांनी शिवसेनेचा दावा सांगितला आहे. आधीच मित्रपक्ष असूनही भाजप-ताराराणी आघाडी फोडून शिवसेनेने महाडिक बंधूंना धक्का दिला. आता त्यांच्या दक्षिण मतदारसंघावरच दावा सांगितल्याने महायुतीतील छुपा संघर्ष उघड झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीतील सर्वच मंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेत निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली. त्याला आठवडा होत नाही तेच काँग्रेस आणि ताराराणी आघाडीतील माजी नगरसेवक-पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेश पार पडला. त्यानंतर लगेचच आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघावर दावा केला. या मतदारसंघातून सध्या भाजपचे अमल महाडिक आमदार आहेत. शिवसेनेने दिलेल्या धक्क्यामुळे आणि क्षीरसागर यांनी केलेल्या दाव्यामुळे महायुतीमध्ये समन्वय ठेवणे अधिक आव्हानात्मक असणार आहे.

माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, दोन माजी महापौर यांच्यासह 23 माजी नगरसेवक आणि पदाधिकार शिवसेनेत गेले. खरंतर यामुळे काँग्रेसला अधिक नुकसान होईल, अशी चर्चा होती. मात्र, ताराराणी आघाडीला मोठे नुकसान सहन करावे लागले. आता आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्वाभाविकपणे शिवसेनेतून या सर्वांनाच उमेदवारी दिली जाईल. पण क्षीरसागर यांच्या विधानामुळे दक्षिण मतदारसंघातही नव्या राजकारणाची सुरुवात झाली आहे. दक्षिण मतदारसंघातील 4 ते 5 वॉर्डमध्ये देशमुख यांची चांगली ताकद आहे.

Rajesh Kshirsagar strengthens Shiv Sena’s hold on Kolhapur South seat
Kolhapur Politics: खासदार पुत्रांचे लाड! DPDC बैठकीतून बाहेर काढण्याचे धाडस जिल्हाधिकाऱ्यांनी का दाखवले नाही?

जागा वाटपावरूनही संघर्ष अटळ :

सुरुवातीला शिवसेनेतील पक्षप्रवेशात काँग्रेस नगरसेवकांची संख्या जास्त आहे असे भासवले गेले. प्रत्यक्षात ताराराणी आघाडीतील 7 आणि भाजपचे 4 माजी नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. सर्वाधिक नगरसेवक हे महायुतीतील असल्याने भविष्यात जागा वाटपात दोन्ही पक्षांमध्येच मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील संघर्ष अटळ असल्याचे देखील सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com