
Hasan Mushrif News : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. मुरगूड पोलिसांनी कागल न्यायालयात या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या आधारे मुश्रीफ यांची गुन्हा रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.
पण अवघ्या 24 तासांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीत घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या क्लीन चीटमधील हवाच काढली आहे. राधानगरी इथे माध्यमांशी बोलताना घाटगे म्हणाले. मुश्रीफ यांना 'कोणताही दिलासा मिळालेला नाही'. मी ही केस कुठेही जाऊ देणार नाही. सभासदांना न्याय देण्यासाठी आपण स्वतः ही केस चालू ठेवणार आहे.
संताजी घोरपडे कारखान्याच्या 40 हजार सभासदांना पैसे घेऊन शेअर्स न देणे, मनी लॉन्ड्री करणे या आरोपांवरून मुश्रीफ यांच्याविरोधात मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यावेळी मुश्रीफ यांनी ही केस चुकीची असल्याची आणि ती रद्द करावी अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण उच्च न्यायालयाकडून मंत्री मुश्रीफ यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.
खरंतर त्यांचा क्लोजर रिपोर्ट मागच्या वर्षी न्यायालयात दिला होता. त्यावर 9 ते 10 वेळा सुनावणी झाली आणि अजूनही लढाई चालू आहे. उच्च न्यायालयात खूप केस पेंडिंग असल्याने आणि कागल न्यायालयात ही लढाई सुरू असल्याने आधी कागल न्यायालयाकडून निर्णय घ्यावा अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत, असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.
तसेच कागल न्यायालय जो काही निर्णय देईल तो मान्य नसेल तर उच्च न्यायालयात यावं म्हणून ही केस निकाली काढली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हापूर दौऱ्यावर आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार हेही घाटगे यांच्या घरी भेट देणार असल्याची माहिती आहे. यावेळी घाटगे आणि पवार यांच्यामध्येही या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.