mla ashok mane.jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jan Surajya Shakti: जनसुराज्य पक्षाच्या अशोकराव मानेंनी आमदार होताच दगा दिला, चर्मकार समाजाच्या आरोपांनी नव्या वादाला तोंड फुटलं

Kolhapur News: कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम रस्त्यावरील सव्वा सहा एकर जागा आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेला देण्याचा निर्णय ऑगस्ट महिन्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Deepak Kulkarni

Kolhapur News: कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम येथील जागेवरून आमदार अशोकराव माने यांच्याबाबत मराठा समाज आक्रमक असताना आता चर्मकार समाज देखील त्याच जागेवरून आक्रमक झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या जागेसंदर्भात उद्योग उभारणीसाठी जागा मिळण्यासाठी प्रयत्नात असताना आमदार अशोक माने (Ashok Mane) यांच्या संस्थेला ही जागा मिळत असल्याने, त्यांच्याबद्दल चर्मकार समाजात देखील रोष वाढला आहे.

कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम येथील विश्व पंढरी समोरील सव्वा सहा एकर ची जागा राज्याच्या मंत्रिमंडळात अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले या संस्थेला देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र आता त्या जागेवर चर्मकार समाजाने देखील दावा केला आहे.

2008 पासून कोल्हापूर जिल्हा चर्म वस्तु उत्पादक कोल्हापुरी चप्पल क्लस्टरकडून सूक्ष्म आणि लघुउद्योग उभारणीसाठी या जागे संदर्भात मागणी करत आहोत. सरकारी पातळीवर कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर अचानक ही जागा आमदार माने यांच्या संस्थेला मिळत असल्याचा आरोप यावेळी अशोकराव गायकवाड यांनी केला आहे.

संबंधित जागेवरील दावा करून समाजातील तरुणांच्या भविष्यावर पाणी ओतू नका, अशी मागणी करत अशोक गायकवाड यांनी ही जागा परत करण्याची मागणी आमदार अशोकराव माने यांच्याकडे केली आहे. दरम्यान, आमदार माने यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्याविरोधात गावोगावी आंदोलन करण्याचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम रस्त्यावरील सव्वा सहा एकर जागा आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेला देण्याचा निर्णय ऑगस्ट महिन्यात राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीत घेण्यात आला. मात्र, यापूर्वी अनेक संस्थांनी त्या जागेची मागणी केली होती.

त्यावर 2008 साली या संस्थेसाठी जागा मागणी केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळाने संस्थेस ही जागा मंजूर केली आहे. या महिला औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून दोन हजार महिलांना रोजगार मिळणार असल्याची प्रतिक्रिया यापूर्वी आमदार अशोकराव माने यांनी दिली होती.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर मराठा समाजात रोष

दरम्यान, या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतर मराठा समाजात रोष पसरला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाने ही जागा मराठा समाजासाठी मिळावी अशी मागणी केली होती. अनेक वर्षांपासून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. प्रशासकीय पातळीवर यंत्रणा सुरू असताना, मंत्रिमंडळाने अशोकराव माने यांच्या संस्थेला जागा दिल्यानंतर महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी त्यांच्या कृत्याचा निषेध केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT