MLA Ashokrao Mane News : भजी खाण्यावरून आमदार बदनाम, अशोकराव मानेंबद्दल लोकांच्या मनात खदखद वाढली...

Ashokrao Mane Bhaji Eating Controversy Explained : गेल्या दहा वर्षांपासून अशोकराव माने हे मतदारसंघातील भाग आणि भाग पिंजून काढत आहेत. आमदार विनय कोरे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक या सर्वांच्या पाठिंब्याने माने हे आमदार झाले.
MLA Ashokrao Mane
MLA Ashokrao Mane Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार तर्फ वडगाव गावातील साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भाडेतत्त्‍वावर देऊ केली आहे. ही जमीन गावाची असून ती बेकायदेशीर पद्धतीने खोटी कागदपत्रे जोडून आणि फेरफार डायरीत खाडाखोड करून दिली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

जमीन परत मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून उपोषणाचा १८ वा दिवस होता. मात्र या संपूर्ण कालावधी हातकणंगलेचे आमदार आंदोलनस्थळी न फिरल्याने ग्रामस्थ नाराज झाले आहेत. आमदार माने हे गावातच एका ठिकाणी येऊन भजी खाल्याचा आरोप या ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत केला.

वस्तुस्थिती पाहता गेल्या दहा वर्षांपासून अशोकराव माने हे मतदारसंघातील भाग आणि भाग पिंजून काढत आहेत. आमदार विनय कोरे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक या सर्वांच्या पाठिंब्याने माने हे आमदार झाले. दलित मित्र म्हणून ओळख असलेले आमदार माने निवडून आल्यानंतर सर्वस्वी आनंद मतदारसंघातील बहुतांश जनतेला झाला. मात्र आमदार होतात नागरिकांच्या भावनेचा आणि प्रश्नांचा विसर पडला की काय? ची परिस्थिती निर्माण झाली आहे.

MLA Ashokrao Mane
Bihar Assembly Election : PM मोदींनी 'भावनिक' अजेंडा सेट केला, राहुल गांधींच्या मेहनतीवर पाणी फिरणार? उद्या बिहार बंद...

शिक्षण संस्था जमीन बळकवण्याच्या प्रयत्नात असताना त्याला कोणाची फूस होती? त्यासाठी कोणी प्रयत्न केले? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र ग्रामस्थांच्या मागणीची दाद किंवा दखल घेणे हे आमदारांचे कर्तव्य होते. मात्र सोयीस्कर रित्या त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थ राजसंह भुजिंगे यांनी आमदार अशोकराव माने यांना म्हणाले, ‘तुमच्या प्रचारासाठी आम्ही गुडघ्याच्या वाट्या झिजवल्या. मात्र, तुम्ही आमची दखलही घेतली नाही. बापू हळूच गावात येतात. कुठेतरी बसतात आणि भजी खाऊन जातात. मात्र, आपल्या उपोषणाला भेट द्यायला त्यांना वेळ मिळाला नाही. या शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

MLA Ashokrao Mane
Fadnavis new political strategy : गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील ‘साईडलाईन’; फडणवीसांचे नवे समीकरण काय सांगते?

वास्तविक पाहता गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देणं हे आमदार यांचे कर्तव्य होते. मात्र कदाचित ग्रामस्थांना संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती असावी. या ठिकाणी भेट देण्यास गेलो तर ग्रामस्थांचा रोष आपल्यावर येईल अशी भीती आमदार माने यांना असावी? म्हणूनच थेट जनतेलाच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत बोलून घेण्यामागचं कारण असावं? अशी देखील चर्चा या निमित्ताने उपस्थित ग्रामस्थांनी केली. त्यामुळेच ग्रामस्थांच्या रडारवर आता आमदार माने आले आहेत.

माजी आमदार राजू आवळे यांनी देखील कोल्हापूर शहरातील मराठा समाजाची जागा ताब्यात घेतल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आमदार माने आणि माजी आमदार आवळे यांच्यात शाब्दिक वाद उफाळून आला. वास्तविक मराठा महासंघ देखील या जागेवरून आक्रमक झाला आहे.

सामूहिक प्रयत्नातून ही जागा परत मिळवण्याचा प्रयत्न मराठा महासंघ करताना दिसून येत आहे. तर कोणत्याही क्षणी हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. दोन समाजातील भावना अधिक तीव्र होण्यापेक्षा समन्वयाची भूमिका आमदार माने यांनी घेण्याची गरज सध्यातरी दिसून येते. अन्यथा हा द्वेष आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com