Sharad Patil Passed Away  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Patil Passed Away : जनता दलाचे नेते, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन!

Sharad Patil Passed Away : 1990 ते 1995 या काळात ते मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

Chetan Zadpe

Sangli News : सांगली जिल्ह्यातून एक दुख:द बातमी येत आहे. जनता दलाचे नेते, माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे आज सकाळी (27 डिसेंबर) निधन झाले आहे. ते सांगली शहरात, कुपवाडा या ठिकाणी राहत होते. काही वर्षांपासून ते दुर्धर आजाराने ग्रस्त होते. (Latest Marathi News)

एकेकाळी माजी आमदार संभाजी पवार, माजी आमदार व्यंकप्पा पत्की आणि प्रा. शरद पाटील हे जनता पक्षाचे समीकरण विधिमंडळात प्रसिद्ध होते. शरद पाटील यांनी 1990 ते 1995 या कालावधीत मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. तसेच पदवीधर मतदारसंघातूनही ते विधानपरिषदेतही निवडून गेले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील काही काळापासून त्यांना कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासले होते. आज पहाटेच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला, यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, जावई, नातवंडे असे मोठे कुटुंब आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT