Sharad Pawar-Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : पवारांच्या हवाल्याने दिलेल्या दिल्लीतील घडामोडींच्या विधानावरून जयंत पाटलांची पलटी; नेमकं काय घडलं?

Delhi Political Events : पवारसाहेब माझ्याशी काही बोलले नाहीत. पवारसाहेब शेकापच्या आंदोलनाला का आले नाहीत, याची मला माहिती नाही. पण, दिल्लीत राजकीय घडामोडी घडत आहेत, असे माझ्या सोर्सने मला कळले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 August : शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख जयंत पाटील यांनी आपल्या विधानावरून पलटी मारली आहे.‘दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून त्यामुळे आपण शेकापच्या अधिवेशनाला येऊ शकत नाही’ असे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आपल्याला सांगितल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला होता.

त्याबाबतच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या होत्या. या विधानावरून पाटील यांनी पलटी मारत ‘आपण असं बोललोच नाही आणि पवारांनीही आपल्याला अशी माहिती दिली नाही’, असे म्हटले आहे.

शेतकरी कामगार पक्षाचं (PWP) 19 वे राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवारपासून (ता. 02 ऑगस्ट) पंढरपूर येथे सुरू झाले. अधिवेशनात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्या मुद्यावरून माघार घेत आपण तसं बोललोच नाही, असे म्हटलं आहे. ते म्हणाले, पवारसाहेब माझ्याशी काही बोलले नाहीत. पवारसाहेब शेकापच्या आंदोलनाला का आले नाहीत, याची मला माहिती नाही. पण, दिल्लीत राजकीय घडामोडी घडत आहेत, असे माझ्या सोर्सने मला कळले आहे.

शरद पवार (Sharad Pawar) असं काहीही बोललेले नाहीत. दिल्लीत गेल्या दहा पंधरा दिवसांपासून सरकार बदलाची चर्चा सुरू आहे. ती चर्चा एवढीच नाही तर जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्याद वाढवली पाहिजे. सध्याचे राज्यकर्ते फसवतात. पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण द्यायचं असेल तर कायद्यात बदल करायला पाहिजे. त्यासाठी सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले, एस, एसटीमधील वर्गीकरणास आमचा पाठिंबा आहे. मात्र, त्यात सुस्पष्टता आणली पाहिजे. पण, राज्यकर्ते कायद्यामध्ये फट ठेवतात आणि त्यामुळे आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी होत नाही. आरक्षण द्यायचे असेल तर मर्यादा वाढविली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. पण सत्ताधारी मंडळी त्यावर बोलतच नाहीत.

जयंत पाटील काय म्हणाले होते?

दिल्लीत मोठी राजकीय घडामोड सुरू आहे. या महिन्यात ती घडणार असल्यामुळे मला शेकापच्या अधिवेशनाला यायला जमणार नसल्याचं शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच फोनवरून सांगितलं होतं. त्यावेळी आपण त्यांना दिल्लीतलं सरकार पाडा आणि मग या. आम्ही तुमचे स्वागत करू, अशा शुभेच्छा दिल्या, असंही जयंत पाटील म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT