Jaykumar Gore-Chandrakant Patil-Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Modi Solapur Tour : मोदींना सोलापुरात आणण्याची जबाबदारी जयकुमार गोरेंनी सोपवली चंद्रकांत पाटलांवर....

Jaykumar Gore Statement : अहिल्यादेवींची 300 वी जयंती संपूर्ण वर्षे साजरी करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे, त्यामुळेच आज देशभरात अहिल्यादेवी यांच्या विचारांचे वातावरण दिसतंय.

Vijaykumar Dudhale, विश्वभूषण लिमये

Solapur, 31 May : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्या स्मारकाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा विद्यापीठाचा संकल्प आहे. चंद्रकांतदादा पाटील हे मोदींच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यामुळे अहिल्यादेवींच्या स्मारकारच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला मोदींना आणण्याची जबाबदारी आपण चंद्रकांदादांवर सोपवूया, असे सांगून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्मारकाच्या उद्‌घाटनासाठी मोदींना आणण्याची जबाबदारी गोरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवली आहे.

अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती सोलापूर विद्यापीठात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना मोदींना सोलापुरात आणण्याची जबाबदारी देऊन टाकली आहे. जयकुमार गोरे हा अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराचा पाईक आहे, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ज्या सोलापूर विद्यापीठाचे नावं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने झालं आहे, त्या विद्यापीठात आज जयंतीचा उत्सव होत आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक विद्यापीठात उभं राहत आहे. अहिल्यादेवींची 300 वी जयंती संपूर्ण वर्षे साजरी करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घेतला आहे, त्यामुळेच आज देशभरात अहिल्यादेवी यांच्या विचारांचे वातावरण दिसतंय.

सुमारे 300 वर्षांपूर्वी समाजकारण, न्यायकारण जरं आपण केलं असतं, तर आपण खूप पुढे असतो. अहिल्यादेवींनी त्यावेळी शिक्षणाचे, पाण्याचे महत्व सांगितलं होतं. आपण आज ते धोरण अंमलात आणतोय. म्हणजे अहिल्यादेवींना किती मोठी दूरदृष्टी होते, हे दिसून येते, असेही गोरे यांनी नमूद केले.

मोगलांचे आक्रमण झालं, तेव्हा हिंदू धर्म संपविण्यासाठी प्रयत्न केलं गेले. मंदिरं उद्‌ध्वस्त करण्यात आली, तेव्हा अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यात काशीविश्वेश्वर मंदिराचा समावेश होता. त्याकाळी अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केला, त्यानंतर आता नरेंद्र मोदींनीच काशीविश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

कृषिमंत्री कोकाटेंना दिला सल्ला

माणिकराव कोकाटे यांनी कृषिमंत्री म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असे विधान केले होते. त्यावर बोलताना गोरे म्हणाले, कृषिमंत्री कोकाटे यांनी काय म्हटलंय, हे मला माहिती नाही. मात्र, हा देश कृषिप्रधान आहे, त्यामुळे या देशातील शेतकरी हा आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा घटक आहे. शेतीप्रधान देशामध्ये शेतकरी आणि अनुषंगाने असलेले पूरक उद्योग हे या देशासाठी आणि जीवनासाठी गरजेचा विषय आहे, त्यासाठी बळीराजा हा भक्कम असला पाहिजे आणि राज्याचं कृषीखातंही भक्कम असलं पाहिजे, त्या दृष्टीने कृषी मंत्र्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे, असा सल्लाही गोरे यांनी कोकाटे यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT