Gore On Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांवरील कारवाईबाबत पालकमंत्री जयकुमार गोरेंचे मोठे भाष्य...

Ranjitsinh Mohite Patil Action Issue : आजचा कार्यक्रम हा पक्षाचा नव्हता, तो विद्यापीठाचा कार्यक्रम होता. त्याला कोणी यावं, याविषयीचं बंधन आम्ही घालू शकत नाही. मात्र, मी पालकमंत्री झाल्यापासून सोबत कोण कोण दिसत आहे, ते तुम्ही बघताय....
Ranjitshinh Mohite Patil-Jaykumar Gore
Ranjitshinh Mohite Patil-Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

Solapur, 31 May : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणारे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विचारण्यात आला. तो प्रश्न विचारताना सोलापूरच्या पहिल्या दौऱ्यात त्यांनी केलेल्या विधानाची आठवणही करून देण्यात आली. त्यावर उत्तर देताना गोरे यांनी ‘मैंने तब भी बोला हैं और मैं अभीभी बोल रहा हूं, आगे आगे देखिये होता हैं क्या...’ असे सांगून मोहिते पाटलांवरील कारवाईबाबत मोठे भाष्य केले आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला रणजितसिंह मोहिते पाटीलही (Ranjitsinh Mohite Patil) उपस्थित होते. मात्र, पालकमंत्री गोरे यांची एन्ट्री होताच काही वेळात त्यांच्या कानात काहीतरी सांगून मोहिते पाटील हे कार्यक्रमातून निघून गेले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना गोरे यांना त्याबाबत आणि कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

मोहिते पाटील यांच्यावरील कारवाईबाबत गोरे म्हणाले, ‘मैंने तब भी बोला हैं और मैं अभीभी बोल रहा हुं, आगे आगे देखिये होता हैं क्या...आजचा कार्यक्रम हा पक्षाचा नव्हता, तो विद्यापीठाचा कार्यक्रम होता. त्याला कोणी यावं, याविषयीचं बंधन आम्ही घालू शकत नाही. मात्र, मी पालकमंत्री झाल्यापासून सोबत कोण कोण दिसत आहे, ते तुम्ही बघताय.., असे सांगून गोरे यांच्या सोबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांची हजेरी असते, हे गोरे यांनी अप्रत्यक्ष सूचित केले.

मी भाजपचा (BJP) कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला कोणाच्या सम्राज्याविषयी (पूर्वी मोहिते पाटलांचं सोलापूर जिल्ह्यात साम्राज्य होतं. पण आता ते कार्यक्रमातून जाताना सांगून गेले असा संदर्भ या वाक्याला होता) बोलायचं नाही. भाजपने मला जी जबाबदारी दिलेली आहे, ती मी पार पाडत आहे. भाजप कार्यकर्त्याला आणि सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घ्यावी, म्हणून पालकमंत्रिपदावर मी काम करतोय, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

Ranjitshinh Mohite Patil-Jaykumar Gore
Ranjitsinh Mohite Patil : पालकमंत्र्यांची एन्ट्री होताच रणजितसिंह मोहिते पाटलांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमातून काढता पाय घेतला!

गोरे म्हणाले, कोणी कानात बोललं आणि कुठंही बोललं, तरी त्याचा परिणाम होत नाही.. आम्हाला आणि जनतेला जे पाहिजे, ते आमच्या कानात व्यवस्थित आहे आणि त्या अनुषंगाने आमचं काम सुरू आहे.

Ranjitshinh Mohite Patil-Jaykumar Gore
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची गाडी सुसाट; काल अजितदादांवर, आज फडणवीसांवर हल्लाबोल,‘मुख्यमंत्र्यांनी धनगरांचा विश्वासघात केलाय’

प्रताप सरनाईकांचे विधान चुकीचे : गोरे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी आता मुंबईची बोली भाषा झाली आहे, असे विधान केले आहे. त्यावर गोरे म्हणाले, प्रताप सरनाईक काय म्हणाले, हे मला माहिती नाही, मात्र त्यांनी असं म्हटलं असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. आपल्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये मराठीच ही एक नंबरची भाषा आहे. आमची मातृभाषा मराठी आहे आणि आपल्या राज्यात मराठीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि आम्ही त्या विचारांचे आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com