Mangalvedha's Leader Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalvedha Politic's : भाजपत प्रवेश करा, लगेच उमेदवारी देतो; भाजप आमदाराची राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांना ऑफर

BJP-NCP Political News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर केसरे यांना आमच्या पक्षात (भाजप) घेतले आहे. तुम्ही आमच्या पक्षात कधी प्रवेश करणार?

Vijaykumar Dudhale, हुकूम मुलाणी

Mangalvedha, 18 May : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्यात याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. भाजपकडून जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मंगळेवढ्यात जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांच्या सत्कार समारंभात भाजप आमदार समाधान आवताडे यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांना नगरपालिकेची उमेदवारी देतो; पण भाजपत प्रवेश करा,’ अशी ऑफरच देऊन टाकली.

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये हालचालींना वेग आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार सोहळे सध्या सुरू आहेत.

सोलापूर भाजपचे (Solapur BJP) नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष (पूर्व विभाग) शशिकांत चव्हाण आणि शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांचा रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या निवासस्थानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास आमदार समाधान आवताडे, भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित जगताप, प्रवीण खवतोडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, माजी नगरसेवक पांडुरंग नायकवडी आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

सत्कारानंतर भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण बोलायले उठले. ते म्हणाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर केसरे यांना आमच्या पक्षात (भाजप) घेतले आहे. तुम्ही आमच्या पक्षात कधी प्रवेश करणार? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांच्याकडे पाहत विचारला. त्यावर ‘केसरे यांनी प्रवेश केला, तर त्यांना नगरपालिकेची उमेदवारी द्या,’ अशी मागणी कोंडूभैरी यांनी भाजप जिल्हाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे केली.

या चर्चेत आमदार समाधान आवताडे यांनी उडी घेत ‘चंद्रशेखर कोंडुभैरी, तुम्ही भाजपत प्रवेश करणार असाल, तर तुम्हाला उमेदवारी जाहीर करतो’ अशी घोषणा केली. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उटला.

सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपत युती होणार असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या गोष्टीला दोन्ही गटांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT