Karad Palika
Karad Palika  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड पालिका : महिला आरक्षणाने आणली दिग्गजांवर वॉर्ड शोधण्याची वेळ

-सचिन शिंदे

कऱ्हाड :  नव्या प्रारूप प्रभाग रचनेत महिला आरक्षणाने कराड पालिकेतील आघाड्यांच्या नेत्यांवर प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अपेक्षित राजकीय उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे. नवख्यांची गर्दीही तर दिग्गजांना प्रभागच शिल्लक नसल्याने राजकीय वातावरण तापणार आहे.

आघाड्यांचा मेळ नव्याने घालून त्यातील बेरजेचे समीकरण पदरात पाडण्यासाठीही फिल्डींग लागली आहे. प्रभागात वाढलेल्या लोकसंख्येने दिग्गजांनाही नवख्यांची मनधरणी करावी लागेल अशी स्थिती असतानाच प्रभाग आरक्षणाने अनेकांनी गाळण उडाली आहे. कऱ्हाडची प्रभाग रचना ७४ हजार ३५५ लोकसंख्येवर असून त्यात ३१ जागांसाठी १५ प्रभाग निश्चित आहेत. दोन सदस्यांचे १४ तर तीन सदस्यांचा एक प्रभाग आहे.

प्रभाग झिकझॅक झाल्याने राजकीय बदल अपेक्षित होते, अशी चर्चा असतानाच आज महिला व अनुसुचित जातींच्या आरक्षण जाहीर झाले आहे. त्या आरक्षणामुळे अनेकांच्या दांड्याच गुल केल्या आहेत. जिथे खुली जागा पडणे अपेक्षीत होते. तेथे महिलांना जागा आरक्षित झाल्याने अनेकजण नाराज झाले. विद्यमान पैकी दोन नगरसवेकांना त्यांच्या घरातील महिलांना उतरवावे लागणार आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये काय आरक्षण पडणार याकडे कऱ्हा़ड शहराचे लक्ष होते. तेथे मोठ्या राजकीय टस्सल अपेक्षित होती.

मात्र, तेथेही एक जागा अनुसूचित जाती तर एक जागा महिलांसाठी राखीव झाल्याने तेथील इच्छुक आघाड्यांच्या नेत्यांना प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. विद्यामान उपाध्यक्ष जयवंत पाटील, लोकशाही आघाडीचे सुभाष पाटील, माजी नगरसेवक असोकराव पाटील यांच्या नानाची चर्चा होती. मात्र तो प्रभाग महिलांना राखीव झाल्याने नेत्यांवरच प्रभाग शोधण्याची वेळ आली. तेथून महिलांमध्ये थेट लढत होणार आहे. तेथे खुल्या जागातील राजकीय टस्सल मात्र महिला आरक्षणाने बोथट होणार आहे. महिला अरक्षण देताना प्रत्येक प्रभागात महिलांना जागा आरक्षित केली आहे.

प्रभाग १५ मध्ये दोन महिलांना तर अनुसूचित जातीसाठी खुली जागा झाली आहे. त्यामुळे तेथील विद्यामान नगरसवेक मोहसीन आंबेकरी यांना  त्यांच्या घरातील महिला सदस्यांना संधी द्यावी लागेल, अशी स्थिती आहे. आरक्षणाने दिग्गजांवर प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. आरक्षणाचा आघाड्यांच्या जुळणीवरही परिणाम शक्य आहे. पूर्वी होणाऱ्या आघाड्यांच्या अपेक्षीत बेरीज विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

विशिष्ठ नगरसेवकांचा प्रभाव आहे, असलेली पूर्वीची ओळख महिला आरक्षणाने धुसर ठरवली आहे. पूर्वीचे १४ तर वाढलेले १५ प्रभाग झाले आहेत. प्रभाग रचनेनंतर महिला आरक्षणामुळे दिग्गजांनाही ते बोट दाखवतील तेथून  निर्विवाद यशाची खात्री नाही. त्यामुळे दिग्गजांनाही निवडणुका सोप्या राहिलेल्या नसल्याने निवडणुका जिकरीच्या ठरणार आहे. महिला आरक्षणामुळे अनेक ठिकाणचा विजयाची गणिते बदलणार आहेत. त्यामुळे कराड शहरातील राजकीय स्थिती, नेतृत्वाला धक्का पोचण्यासारखी स्थिती आरक्षणाने झाली आहे.

संपर्क असणाऱ्या दिग्गजांसह नवख्यांनाही प्रभाग आरक्षणामुळे गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. माजी नगरसेवक कानोसा घेत आहेत. चौका चौकात ठिय्या मारून त्यावर चर्चा घडताहेत आरक्षणामुळे  राजकीय वातावरणही बदलण्याचेही संकेत आहेत. मात्र त्याचवेळी आघाड्या कशा होणार यावर बरच काही अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT