Kolhapur Raju Shetti Farmers Protest :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Farmers Protest : 'ऊसदर जाहीर करा, मगच प्रीतीसंगमवर या'; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा...

Karad Protest News : मंत्री आणि आमदार-खासदार या लोकप्रतिनिधींना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Chetan Zadpe

विशाल पाटील -

Karad News : ऊसदराचा प्रश्न मिटत नसल्याने तसेच शेतकरी संघटनांच्या मागणीचा सकारात्मक विचार कारखानदार तसेच सरकारकडून केला जात नसल्याने आता मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार-खासदार या लोकप्रतिनिधींना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

शनिवार दि. २५ रोजी कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच जिल्ह्यातील आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. मात्र, अगोदर ऊसदर जाहीर करा मगच कृषी प्रदर्शनाला या, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडणार असल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दि. २५ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कराडला प्रितीसंगम घाटावर समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर कराडच्या कृषी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप ऊसदराचा प्रश्न मिटला नसल्याने एकाही मंत्र्यांना आणि आमदार-खासदारांना फिरू देणार नाही, असे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी म्हटले आहे. तसेच जर कोणी या कृषी प्रदर्शनाला आले तर त्यांना काळे-झेंडे आणि गनिमी काव्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीला बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सुनील कोळी, बीआरएसचे विश्वास जाधव, सागर कांबळे, विशाल बडेकर, स्वाभिमानीचे अध्यक्ष देवानंद पाटील, बापूसो मोहिते, शहाजी पाटील, रयत संघटनेचे अशोक लोहार उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT