Fraud  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : जीएसटी अधिकाऱ्याला गोल्ड लाईफचं याड; 1 कोटी 11 लाखांची फसवणूक

Rahul Gadkar

Kolhapur News : गुंतवणुकीवर दरमहा पाच टक्के परतावा देण्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची 1 कोटी 11 लाख रुपयांची फसवणूक करणे जीएसटी अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीच्या प्रमुखासह नऊ जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून. कंपनी प्रमुख, जीएसटी अधिकाऱ्यांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत, विजया दीपक कांबळे (रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) यांनी फिर्याद दिल्यानंतर कंपनीचा प्रमुख इंद्रजीत सुभाष कदम याच्यासह राहुल शशिकांत गाडवे अधिकारी कुमार जोतिराम उबाळे, अमरदीप बाबूराव कुंडले, आबासो बाळू वाडकर या पाच जणांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरा Kolhapur तील राजारामपुरी येथील तिसऱ्या गल्लीत असलेल्या गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीने कार्यालय होते. ऑगस्ट 2022 पासून कंपनी गुंतवणूकदारांकडून पैसे भरून घेत होती. दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित केले जात होते.

सुरुवातीचे काही महिने परतावे दिल्यानंतर मार्च 2023 पासून परतावे देणे बंद केले. याबाबत काही गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यांच्या सूचनेनुसार आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने चौकशी करून कंपनीतील नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. गोल्ड लाईफ डिस्ट्रीब्युटर्स कंपनीच्या वतीने राजारामपुरी परिसरात अलिशान कार्यालय उघडण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी हे कार्यालय विकल्याचे समोर आले आहे. हे कार्यालय विकून 18 कोटी रुपये गुंतवणूकदारांचे परत केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कंपनीचा म्होरक्या इंद्रजित कदम याने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक पद्धतीची आमिषे दाखवली होती. त्यासाठी आपण परप्रांतीय नसून स्थानिक रहिवासी असल्याचा दावा करत होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जर पैसे बुडाल्यास शिरोली पुलाची येथे माझी भरपूर शेतजमीन आहे. ती विकून तुमचे सगळे पेंसे देईन, असा विश्वास तो गुंतूवणूकदारांना देत होता. त्यासंदर्भात सेमिनारमधून गुंतवणूकदारांचे मन परिवर्तन करत होता.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT