Parliament Winter Sessions : ..तर भाजपला हवा तोच मुख्य निवडणूक आयुक्त? राघव चड्ढांचे संबित पात्रांवर ताशेरे..

Election Commissioner Appointment Bill : सीईसीच्या नियुक्तीमध्ये सरन्यायाधीशांना सामावून घेतल्याने आयोगाची निष्पक्षता आबाधित राहिल.
Raghav Chadha
Raghav ChadhaSarkarnama
Published on
Updated on

Parliament Winter Sessions : संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान, मंगळवार दि. 12 डिसेंबर 2023 रोजी देशातील मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठी आणलेल्या विधेयकावर चर्चा झाली. यात नवीन सीईसी विधेयकानुसार सत्ताधारी केंद्र सरकारने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दुरुस्ती विधेयक आणले असून त्यानुसार आता निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये तीन लोकांची प्रमुख भूमिका असणार आहे.

त्यामध्ये विरोधी पक्षनेते, पंतप्रधान आणि एक कॅबिनेट मंत्री यांचा समावेश आहे. या विधेयकाला सर्व विरोधी पक्ष विरोध करत आहेत. त्यामुळे सीईसीच्या नियुक्तीमध्ये 2:1 असे प्रमाण होईल, अशी भूमिका विरोधकांनी मांडली आहे. म्हणजे सरकार ज्याला वाटेल त्यालाच निवडणूक आयुक्त बनवेल.

Raghav Chadha
Nagpur Winter Session : लोकसभेतील घटनेनंतर विधान भवनाची सुरक्षा वाढविली

अशा परिस्थितीत निवडणूक आयुक्तांचे निर्णय स्वतंत्र नसून त्यांचा कल सत्तेतील सरकारचे हित लक्षात घेऊन काम करण्याकडे असेल, त्यामुळे विरोधी पक्षांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाच्या निःपक्षपातीपणालाही आव्हान दिले जाईल, कारण केवळ निवडणुका घेणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी नाही.

दरम्यान, चर्चेत बनावट स्वाक्षरी प्रकरणी निलंबित आणि बिनशर्त माफी मागून राज्यसभेवर बहाल करण्यात आलेल्या राघव चढ्ढा Raghav Chadha यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी संबित पात्रा यांच्यावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, जर हे विधेयक मंजूर झाले तर संबित पात्रा यांनाही मुख्य निवडणूक आयुक्त CEC बनवले जाईल, त्यामुळे आयोगाची निष्पक्षता नष्ट होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राघव चढ्ढा सीईसीमधील सरन्यायाधीशांची भूमिका हटवण्यास विरोध करत होते. अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या सपा खासदार जया बच्चन Jaya Bachchan यांना उद्देशून ते म्हणाले, सीईसीमध्ये फक्त तीन सदस्य ठेवले जात आहेत. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि कॅबिनेट मंत्री जे योग्य नाही. अशा स्थितीत सरकार ज्याला पाहिजे तो मंत्री होईल.

(Edited by Amol sutar)

Raghav Chadha
Parliament Security Breach : लोकसभा घुसखोरी प्रकरणात लातूर कनेक्शन; अमोल शिंदेंसह तीन जण ताब्यात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com