Kolhapur Political News : कोल्हापुरात भाजपच्या महिलांचे काँग्रेसच्या 'साहू'ना 'जोडे'

Demonstrations against Congress : बेनामी संपत्ती विरोधात निदर्शने करत केला निषेध व्यक्त...
Demonstrations against Congress
Demonstrations against CongressSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे 300 कोटीहून अधिक बेनामी संपत्ती सापडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज भाजप कोल्हापूर महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला काळे झेंडे दाखवत साहूच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले.

याप्रसंगी बोलताना महिला अध्यक्षा रूपाराणी निकम म्हणाल्या, एका खासदाराच्या घरात 300 कोटींहून अधिक बेनामी संपत्ती निघते, ही निंदनीय गोष्ट आहे. कॉंग्रेस Congress खासदार, आमदार हे जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठी न वापरता काँग्रेसीवृत्तीने आपली स्वत:ची घरे भरण्याचे काम करत आहेत. ही फक्त एक घटना निदर्शनास आली आहे. परंतु अशा कितीतरी घटना असतील की, ज्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणता भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा बाहेर पडेल.

Demonstrations against Congress
Sharad Pawar : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; कांद्यावरची निर्यात बंदी उठविण्यासाठी आग्रही

अशा वृत्तीच्या विरोधात भाजप BJP पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. एका खासदाराकडे इतकी संपत्ती मिळून येणे यातून देशासाठी त्यांना किती आत्मीयता आणि तळमळ आहे यातून दिसून येते. यासर्व गोष्टीचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर उपस्थित महिलांनी खासदार धीरज साहू Dhiraj sahu यांच्या पुतळ्याला जोडे मारून आपल्या तीव्र भावना दर्शवल्या.

फलक ठरले लक्षवेधी...

ना नीती विकासाची... ना भीती कायद्याची... कॉंग्रेसला आहे फक्त हाव नोटांची... देशाचा एकेक रुपया परत द्यावाच लागेल... धीरज साहूला जेलची हवा खावीच लागेल... 70 वर्षे देश लुटला... कॉंग्रेसने फक्त पैसा खाल्ला... गरीब जनतेचे घास हिरावले... काँग्रेसींनी स्वत:चे इमले बांधले.. अशा आशयाचे फलक यावेळी दाखवण्यात आले.

( Edited by Amol Sutar )

Demonstrations against Congress
Akola News : मालमत्ता करविरोधातील आंदोलनात शिवसेना आणखी आक्रमक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com