Shahu Maharaj Chhatrapati Vs Sanjay Mandlik: कोल्हापूरची अस्मिता म्हणजे शाहू महाराज (Shahu Maharaj) होय तर कोल्हापूरचा विकास पुरुष आणि लोकनेता म्हणजे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक. (Sadashivarao Mandalik) राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पाईक म्हणून शाहू महाराज छत्रपती यांच्याकडे पाहिले जाते, तर कोल्हापूरच्या दक्षिण भागाला पाण्याकडून समृद्ध करण्यासाठी धडपडणारे स्वर्गीय लोकनेते म्हणून सदाशिवराव मंडलिक यांच्याकडे पाहिले जाते. अशा या पूर्वजांच्या कामावर आणि त्यांचे फलित घेऊन लोकसभा निवडणुकीत त्यांचे वारस स्वार झाले आहेत. खरेतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसंबंधी आदराची भावना ठेवणे आवश्यक आहे, पण वास्तविक कार्यकर्त्यांना या निवडणुकीचे वातावरण तापायच्या आधीच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विसर पडला आहे. याचा प्रत्यय उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच दिसून आला आहे.
वास्तविक पाहता कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha Elections) राजर्षी शाहू महाराज यांचे नातू शाहू महाराज हे महाविकास आघाडी संघटित काँग्रेसकडून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महायुती संघटित शिवसेनेकडून (Shivsena) विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून देशात जातीय राजकारणाला अधिक महत्त्व आले आहे ही वस्तुस्थिती आहे. जातीय रंग देण्यापासून ते पक्ष फोडण्यापर्यंतचे राजकारण हे सर्वश्रुत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेच्या मनात नेमके काय आहे हे दिसून येईल. पण ज्या पद्धतीने निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास काही दिवस शिल्लक असताना एकमेकांना उकसवण्याचे कामं करून वातावरण तापवण्याचे काम सुरू आहे. ती पद्धत म्हणजे लोकशाही अधिक धोक्यात घालण्याचे उदाहरण आहे. ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या (MVA) कार्यकर्त्यांकडून लोकशाही धोक्यात आल्याचा प्रचार केला जात आहे. ज्या पद्धतीने महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जुन्या वादाच्या गोष्टी उकरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावरून लोकशाहीचे महत्त्व शिल्लक राहिले की नाही? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
सोमवारी काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती दिली. नेमका हा मेसेज काय याबाबत माहिती मिळाली नसली तरी, हा संदेश शाहू महाराज छत्रपती यांच्या दत्तक प्रकरणावर असल्याचे सांगितले जात आहे, तर विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या सवयीविषयी आणि स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या संबंधित पण नावे बदलून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.
शिवसेनेच्यां ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. वास्तविक पाहता ही निवडणूक निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनात संजय मंडलिक यांच्याबद्दल राग आहे. पण त्यांच्याकडून अशा पद्धतीची टीका ही मंडलिक गटाच्या जिव्हारी लागली आहे. त्याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीदेखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना इशारा देत जाहीर आव्हान दिले आहे.
कोल्हापूर लोकसभा निवडणूक ही व्यक्तिगत पातळीवर नसून वैचारिक पातळीवर लढवली जाणार आहे. ही लढत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनीदेखील मान्य केले आहे. कोणावरही टीकाटिप्पणी न करता ही निवडणूक वैचारिक पातळीवर नेली जावी, अशीच भावना नेत्यांची आहे. मात्र, याच नेत्यांचे पाठबळ उतावीळ झालेल्या कार्यकर्त्यांच्या मागे आहे. कार्यकर्त्यांनी आपली प्रचाराची पातळी गमावली असून, थेट या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्वजांना यात ओढले जात आहे. शिवाय वादाचा इतिहास समोर करून एकमेकांना उकसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींची जबाबदारी या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाढली आहे.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.