Loksabha Election 2024 : राम मंदिरामुळे भाजपची सहा टक्के मतं वाढणार? पृथ्वीराज चव्हाणांनी दिले 'हे' उत्तर

Prithviraj Chavan News : 2019 मध्ये पुलवामा घटनेमुळे सहानुभूतीच्या लाटेमुळे भाजपची सहा टक्के मते वाढली. या वेळीदेखील राम मंदिरामुळे सहा टक्के मते वाढतील, असे भाजप नेत्यांना वाटत आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan sarkrnama

Loksabha Election : साताऱ्याच्या जागेवरील महायुतीतमध्ये अजित पवार गटाकडील ही जागा भाजपकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. संभाव्य उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्याकडे असल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी साताऱ्याचा दौरा करत संभाव्या उमेदवारांचा आढावा घेतला. मात्र, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी येथून निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही जागा शरद पवार यांच्याकडे असल्याचे स्पष्ट करत 400 पारची घोषणा करणार भाजप 250 पार होणार नाही, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

Prithviraj Chavan
Lok Sabha Election 2024 : "महाराजांचे स्थान अबाधित ठेवायचं असेल, तर...", मुश्रीफांनी MVA च्या कार्यकर्त्यांना सुनावलं

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, 2019 मध्ये पुलवामा घटनेमुळे सहानुभूतीच्या लाटेमुळे भाजपची सहा टक्के मते वाढली. या वेळीदेखील राम मंदिरामुळे सहा टक्के मते वाढतील असे भाजप नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे ते 400 पार म्हणत आहेत. न्यायालयाने हिंदू ट्रस्टला जमीन दिली. हिंदू ट्रस्टच्या लोकांनी वर्गणी गोळा करत भव्य राममंदिर बांधायचा प्रयत्न केला. दोन तीन वर्षांत राम मंदिर पूर्ण होईल. यामध्ये नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) काय संबंध आहे. त्यांना प्राणप्रतिष्ठा करायला बोलवले म्हणजे त्यांना सगळी मतं पडतील, असे त्यांना वाटत असेल तर तसे होणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप 370 आकडा का सांगत आहेत, तर राज्यघटना बदलण्यासाठी 543 सदस्यांच्या संसदेत दोन तृतीयांश बहुमत पाहिजे. म्हणून त्यांनी हा आकडा सांगितला आहे. भाजपचे खासदारदेखील आम्ही घटना बदलू असे म्हटले आहे. त्यामुळे ही निवडणूकच घटना बदलण्यासाठी आहे.

आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलायची आणि मनुस्मृती आणायची आहे. त्यासाठी इलेक्शन होत आहे, पण लोकांनी हे इलेक्शन हाती घेतलं आहे. भाजप 250 जागाही पार करणार नाही. 400 पार तर कुठल्या कुठे राहिले, असेदेखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

R

Prithviraj Chavan
Solapur News : ‘आम्ही लग्नाळू...’ म्हणत तरुणांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा नेणाऱ्या बारसकरांची नवी अफलातून घोषणा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com