Kolhapur Loksabha Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Loksabha Election : महिला मेळाव्यात लोकसभेची पेरणी, मुख्यमंत्री आज कोल्हापुरात

Eknath Shinde At Kolhapur : हे दोन्ही मतदारसंघ शिवसेना लढवणार की, ते भाजपकडे जाणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू असून, मुख्यमंत्री या कार्यक्रमात काही विधान करणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Politics : कोरोची येथे होणाऱ्या महिला मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज येणार आहेत. या निमित्ताने जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीबद्दल चर्चा होणार असून, मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना काय संदेश देतात याकडे लक्ष लागले आहे. हे दोन्ही मतदारसंघ शिवसेना लढवणार की ते भाजपकडे जाणार याबाबत सध्या जोरदार चर्चा असून, मुख्यमंत्री याबाबत सूचक विधान करण्याची शक्यता आहे. Eknath Shinde At Kolhapur

लोकसभा निवडणुकीची ( Loksabha Election ) आचारसंहिता पुढील काही दिवसांत जाहीर होईल. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येईल. मात्र, सध्या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागावाटपावरून जोरदार चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत कोल्हापूर लोकसभा ( Kolhapur Constituency ) मतदारसंघ काँग्रेसला देण्याचे निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. या उलट महायुतीमध्ये मात्र अद्याप सुदोपसुंदीच दिसून येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विद्यमान खासदार शिवसेनेचे असल्याने हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडेच राहतील अशी भूमिका शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे, तर या दोन्हीपैकी एक जागा भाजपला मिळावी, असा आग्रह भाजप नेत्यांनी धरला आहे. त्यामुळे नेमके चित्र काय असेल हे अद्याप स्पष्ट नाही. या चर्चांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) कोरोची येथील महिला मेळाव्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दोन्ही मतदारसंघ शिवसेनेलाच ( Shivsena ) मिळावेत, यासाठी शिवसैनिकांचा आग्रह असून, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर कार्यकर्ते आपली भूमिका मांडणार का? याचीही उत्सुकता आहे. निमित्त महिला मेळाव्याचे असले तरी चर्चा मात्र लोकसभेचीच असणार आहे.Kolhapur Loksabha Election

बैठक दिल्लीत, चर्चा कोल्हापुरात

भाजपच्या ( BJP ) प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये झाली. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांचाही समावेश होता. या वेळी कोल्हापूरच्या दोन्ही जागांबद्दल चर्चा झाल्याचे सांगितले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit Shah नुकतेच येऊन गेले. त्यांच्यासोबतही महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शाह यांनी जागांचा आग्रह न करण्याची विनंती दोन्ही घटक पक्षांना केली. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूरच्या जागेबद्दल भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा असून, ही जागा आपल्याला मिळेल असा त्यांना विश्वास आहे.

Edited By : Rashmi Mane

R

SCROLL FOR NEXT