Shivsena - Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uddhav Thackeray Shivsena: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप? कोल्हापुरातला नेता शिंदेंच्या संपर्कात,धनुष्यबाण उचलणार..?

Kolhapur Mahapalika Election: सध्या कोल्हापूर महापालिकेत अजून अधिकृत उमेदवारी घोषित झाली नसली तरी अनेकांनी पक्षाचे चिन्ह वापरत प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस, भाजपा (BJP), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही उमेदवार त्याची तयारी देखील केली आहे.

Deepak Kulkarni

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाची लगबग सुरू आहे. प्रभागातील ताकदवान चेहरा आपल्याकडे खेचण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. तर महाविकास आघाडी, महायुतीमधील अनेक घटक पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर अनेकांच्या येत्या दोन दिवसात होणार आहेत.

अशा परिस्थिती कोल्हापूर (Kolhapur) महापालिकेत बेरजेचे राजकारण करत असताना महायुतीकडून महाविकास आघाडीतील अनेकांना गळाला लावले जात आहे. ज्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. त्यांना प्रचाराला सुरुवात करण्याचा निरोप धाडण्यात आला आहे.

सध्या कोल्हापूर महापालिकेत अजून अधिकृत उमेदवारी घोषित झाली नसली तरी अनेकांनी पक्षाचे चिन्ह वापरत प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस, भाजपा (BJP), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही उमेदवार त्याची तयारी देखील केली आहे. ज्या प्रभागात आपल्याठिकाणी आणखीन इच्छुक नाही. अशा प्रभागात त्याने आपली उमेदवारी निश्चित मानली आहे. पण ठाकरे सेनेचा माजी नगरसेवक थेट पक्षाचे चिन्ह न वापरता थेट प्रचाराला सुरुवात केली आहे.

मागील सभागृहातील माजी नगरसेवक नियाज खान यांनी ठाकरे सेनेची मशाल न घेता प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे अनेकांना खान नेमके कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार? असा प्रश्न पडला आहे. शिवाय कार्यकर्ते देखील संभ्रमात आहे.

शिवसेनेचे मागील सभागृहात चार नगरसेवक होते. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. तर नियाज खान आणि प्रतिज्ञा उत्तुरे या ठाकरे सेनेसोबत राहिले. मात्र महापालिका निवडणूक जाहीर होताच नियाज खान यांनी समाजमाध्यम आणि प्रभागात प्रचाराला सुरुवात केली. मात्र महाविकास आघाडीत आपल्या प्रभागात प्रमुख दावेदार असून देखील त्यांनी आपल्या प्रचारात मशाल चिन्हाचा वापर केला नाही.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी जागावाटपात नियाज खान यांच्या प्रभागात त्यांच्या उमेदवारीवर दावा सांगितला होता. ही चर्चा सुरू असताना मागील काही दिवसात खान यांनी शिवसेनेतील नेत्यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. शिवाय आज पुन्हा एकदा शिवसेनेतील उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची सांगितले जाते. त्यामुळे येत्या दिवसात ठाकरे सेनेत पुन्हा भूकंपाची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT