Kolhapur Election: दोस्तीत कुस्ती, मुश्रीफ महायुतीत! महाविकास आघाडीचा लोड एकट्या सतेज पाटलांवर

Kolhapur Election: गेल्या दहा वर्षात जसे राज्यातील राजकारण बदलले तसेच महापालिकेच्या राजकारणावर देखील सध्या परिणाम झालेला आहे.
Satej Patil - Hasan Mushrif
Satej Patil - Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Election: सहकार आणि काही नगरपालिकांमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची मैत्री कायम घट्ट दिसली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील स्वतंत्र लढले असले तरी निकालानंतर एकत्र येत महापालिकेवर आघाडीचा झेंडा फडकवला. पण गेल्या दहा वर्षात जसे राज्यातील राजकारण बदलले तसेच महापालिकेच्या राजकारणावर देखील सध्या परिणाम झालेला आहे. आघाडीच्या राजकारणात नेहमी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना साथ दिली होती. मात्र यंदा ती परिस्थिती उलट आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे एकमेकांच्या विरोधात ठाकणार आहेत.

Satej Patil - Hasan Mushrif
Lionel Messi: मेस्सीच्या दौऱ्यामुळं गेलं मंत्रिपद! मुख्यमंत्र्यांनी काढली खरडपट्टी अन् घेतला मोठा निर्णय

महापालिका निवडणुकीसाठी मतदान दहा वर्षांनी होत असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत निश्चित आहे. २०१५ मध्ये काँग्रेस व तत्कालीन राष्ट्रवादीसह शिवसेनेने मिळून सत्ता मिळवली होती. आता काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व शिवसेना ठाकरे पक्ष विरुद्ध महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे पक्ष व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असा हा सामना होणार आहे. त्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पण काँग्रेस. अधून एकट्या आमदार सतेज पाटलांना कोल्हापूरसह इचलकरंजी महापालिकेची खिंड लढवावी लागणार आहे.

Satej Patil - Hasan Mushrif
Nitish Kumar: नितिश कुमारांनी महिलेच्या चेहऱ्यावरचा हिजाब खेचला! व्हिडिओ व्हायरल, लाजिरवाण्या कृत्याचा होतोय निषेध

राज्यात व केंद्रातही महायुतीचे सरकार आहे. गेल्या चार वर्षात राज्यात झालेल्या राजकीय बदलाचे प्रतिबिंब कोल्हापूर शहर व जिल्ह्यातही उमटले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये आमदार सतेज पाटील यांच्यासोबत काही नगरपालिकांमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आघाडी झाली. शिवाय सहकारात अजून देखील मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची मैत्री कायम आहे. महापालिकेच्या राजकारणाचा विचार केला तर काँग्रेसकडे सध्या आमदार सतेज पाटील यांच्या व्यतिरिक्त मोठा नेता नाही. महायुती म्हणून मंत्री मुश्रीफ यांना भाजप आणि शिवसेनेशी प्रामाणिक रहावे लागेल. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व ठाकरे गटाकडे उमेदवारांना ताकद देईल, अशा नेत्यांची वानवा आहे. दुसरीकडे विरोधात मात्र तगड्या आणि सत्तेत असलेल्या नेत्यांची फौज आहे.

Satej Patil - Hasan Mushrif
Nilesh Rane : इशारा देणाऱ्या तेलींना निलेश राणेंनी फटकारलं; सब कुच्छ ठिक है म्हणत दिला मोलाचा सल्ला

महायुतीकडून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सत्यजित कदम यांची तगडी फौज उमेदवारांच्या दिमतीला असणार आहे. पण महाविकास आघाडीकडे काँग्रेसकडून खासदार शाहू महाराज, जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील हे प्रचाराच्या फ्रंटवर असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com