Dhananjay Mahadik, Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : सतेज पाटील जे काही बोलतील त्याला प्रत्युत्तर मिळेलच; खासदार महाडिकांनी दिला इशारा

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व महायुती झालेली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूरचे काँग्रेसचे नेते हे प्रत्येक निवडणुकीत एक स्लोगन काढतात आणि लोकांना फसवतात. नेहमी जे चालतं ते या निवडणुकीत चालणार नाही. त्यांनी काढलेल्या टायगलाईनला आम्ही उत्तर देणे हे क्रमप्राप्त होतं. त्यांना उत्तर दिलेला आहे. भविष्यात ते जे बोलतील त्याला उत्तर दिलं जाईल. असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला. आज ते कोल्हापुरात बोलत होते. सतेज पाटील यांच्या टिकेला उत्तर देण्याची आता गरज नाही. ते आता सैरभैर झालेले आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यांनी तीन ठिकाणी पती-पत्नीला उमेदवारी दिली यावरून त्यांच्याकडे उमेदवार नाहीत. अशी टीका खासदार महाडिक यांनी केली.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभूतपूर्व महायुती झालेली आहे. 81 उमेदवारांची निवड करताना कसरत झाली. काहींनी वेगळे फॉर्म भरलेले आहेत, त्यांनाही थांबवण्याचा प्रयत्न होईल. आज या सर्व उमेदवारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये आचारसंहितेचे पालक खर्चाचं नियोजन प्रचार कशा पद्धतीने करावा प्रचाराचे मुद्दे कोणते असावे? या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी महायुतीचे नेते हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह सर्व नेते या उमेदवारांना भेटणार आहेत. निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी काही तंत्र मंत्र प्रक्रिया या सर्वांची माहिती आम्ही या सर्वांना देणार आहोत. आम्हाला विश्वास आहे या निवडणुकीत महायुतीचा झेंडा हा महापालिकेवर फडकेल, असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

दहा वर्षानंतर निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आणि अनेकांवर अन्याय म्हणून झालेला आहे. महायुती म्हणून लढत असल्याने अनेकांवर अन्याय झालेला आहे. आम्ही या नाराजांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे. मनधरणी केलेली आहे. त्यामध्ये आम्हाला यश आले आहे. तर अनेकांचे अर्ज उद्या बाहेर पडतील. असेही खासदार महाडिक म्हणाले.

12 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरला वेळ दिलेली आहे. पारंपारिक पद्धतीने सभा किंवा रोडशो न घेता मिसळ कट्टा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा एक तासाचा टॉप शो घेण्यात येईल. कोल्हापूर शहरातल्या सर्व प्रभागांमध्ये स्क्रीन द्वारे तो दाखवण्यात येईल. या टॉक शो वेळी कोल्हापूर शहरातले नागरिक उपस्थित असतील, अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली.

विरोधकांवर मी बोलण्याची गरज नाही. एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीने काम करण्याची त्यांची सवय आहे. निवडणूक सुरू होण्याअगोदरच त्यांनी काही उमेदवारांना दम देण्यास सुरुवात केलेली आहे. हे सगळ्यांनी पाहिले. त्यांच्या या हुकूमशाहीमुळे राष्ट्रवादी सुद्धा त्यांच्यापासून बाहेर पडलेली आहे. लोकांना एकत्रित घेऊन समन्वयान काम करावं ही त्यांची भावना नाही, असा टोला ठाकरे गट काँग्रेसमध्ये झालेल्या तानातानी वरून खासदार महाडिक यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT