Kolhapur Politics  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कौतुक की टोमणा? पी. एन. पाटलांनी सतेज पाटलांना कुणाच्या पराभवाची करून दिली आठवण?

Satej Patil News : 'कोल्हापुरात सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईनसाठी चांगला पाठपुरावा केला'

Rahul Gadkar

Kolhapur Political News : कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या ‘सतेज कृषी प्रदर्शन 2023’ची सांगता नुकतीच झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानी आमदार पी.एन. पाटील आवर्जून उपस्थिती होते.

आमदार सतेज पाटील आणि आमदार पी. एन. पाटील यांच्यातील दोस्ताना वाढत असून, शहरात त्याची वेगळी चर्चा सुरू असताना आमदार पी. एन. पाटील यांनी माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या पराभवाची आठवण सतेज पाटील यांना करून दिली. पी. एन. यांच्या विधानावरून हे सतेज पाटील यांना टोमणे होते की, त्यांचे कौतुक होते याची आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, 'कोल्हापूरमध्ये चांगला दवाखाना आणणाऱ्या दिग्विजय खानविलकर यांना आमदार सतेज पाटील यांनी पराभूत केले. तर, आमदार सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन मंजूर केली, त्याचवेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. यावरून कोल्हापुरात चांगलं चालत नाही की काय? अशी परिस्थिती आहे. तरीही, सतेज पाटील सातत्याने काम करत आहेत', असे आमदार पी. एन. पाटील म्हणाले.

'कोल्हापुरात सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईनसाठी जोरदार पाठपुरावा केला. मात्र, काही तरी चांगलं करत असेल तर ते सध्या चालत नाही, अशी परिस्थिती आहे. तरीही नेटाने आणि जोमाने काम करावे लागते,' असेही पी. एन. पाटील यांनी नमूद केले.

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, 'सतेज पाटील यांनी भरवलेले कृषी प्रदर्शन निश्‍चितपणे चांगले आहे. याचा कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना चांगला फायदा झाला आहे. आमदार पी. एन. पाटील हे माझ्यामागे सावलीप्रमाणे असतात.

आज आपण जे काही आहे त्यामध्ये पाटील यांचा मोलाचा वाटा आहे.’ दरम्यान, आमदार सतेज पाटील यांचा अनुभव असाच असल्याचे त्यांनी सांगताच, उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस पाटील, कृषी महाविद्यालयाचे डॉ. पिसाळ, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील आणि संचालक उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT