Satej Patil, Chandrakant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : 'सतेज पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव धुडकावला, हिरो बनायचं होतं..', क्षीरसागर, देशमुखांचा हल्लाबोल

Satej Patil vs Chandrakant Patil : अपयश मिळते त्यावेळी कार्यकर्ता अन् यश मिळते त्यावेळी माझ्यामुळे ही भावना सतेज पाटलांचा व्यक्ती दोष आहे, अशी टीका पत्रकार परिषदेमध्ये महायुतीच्या नगरसेवकांनी केली.

Rahul Gadkar

Kolhapur News : गोकुळ दूध संघावरून कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण पेटले असताना मंत्री चंद्रकांत पाटील आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. त्यावर महायुतीच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत आमदार सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सतेज पाटलांना हिरो बनायचं होतं म्हणून मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव धुडकावला, अशी टीका नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी केली तर, नगरसेवक शारंग देशमुख यांनी देखील सतेज पाटलांचा व्यक्ती दोष काढला.

शारंग देशमुख म्हणाले, 'अपयश मिळते त्यावेळी कार्यकर्ता अन् यश मिळते त्यावेळी माझ्यामुळे ही भावना सतेज पाटलांचा व्यक्ती दोष आहे. सतेज पाटील, ऋतुराज पाटील आणि जयंत असगावकर यांचा परभवाचे खापर दुसऱ्यावर फोडायचे. मात्र विजय झाला तर प्रत्येक निवडणुकीत मी एकटा लढलो असे बोलूनं राजू शेट्टी, शाहू महाराज यांचा त्यांना विसर पडला.'

देशमुख म्हणाले की, '२००८ ला स्थायी समिती सभापती निवडीत आमचं बहुमत असताना सुनील मोदी चेअरमन झाले. त्यावेळी त्यांनी पार्टी म्हणून करावे लागते असे उत्तर आले. जर त्यांना राजकारण करायचं असेल तर सगळं करणार आणि दुसऱ्यांनी केले तर चुकीचे आणि त्यावर वाईट बोलणार. सत्तेचा गैरवापर कोणी केला असेल तर सतेज पाटील यांनी केला.'

पत्रकार परिषदेला शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रावादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास , भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईकनिंबाळकर, प्रदेश सचिव महेश जाधव उपस्थित होते.

जशास तसे उत्तर देणार

काँग्रेस नगरसेवकांनी टीका केली की चंद्रकांत पाटील यांना सत्तेचा माज आला आहे. मुळात चंद्रकांत पाटील हे नेते माज करणारे नेते नाहीत .सत्ता आल्यावर कोणाला माज येतो, हे जनतेने पाहिले आहे .दादांची एक गोष्ट सांगावी ज्याच्यातून त्यांनी सत्तेचा माज दाखवला आहे.जर दादांवर कोण बोलले तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT