Kolhapur Vidhan Sabha hasan Mushrif, Samarjit singh Ghatage, sanjay Mandlik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Vidhan Sabha : मंडलिकांचं मुश्रीफ का घाटगे ठरलं! कागलमध्ये शिवसेना शिंदे गट भाजपच्या विरोधात?

Hasan Mushrif : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवाराला जवळ केल्याने महाविकास आघाडीला उमेदवारीचा शोध घ्यावा लागणार आहे. तत्पूर्वी महायुतीमधील दोन दिग्गज एकमेकांना भिडले आहेत.

Rahul Gadkar

राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस चांगलीच ईर्षा निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती उमेदवार अशी लढत होणे अपेक्षित असताना केवळ महायुतीतील नेत्यांमध्ये प्रचंड चुरस आणि राजकीय षडयंत्र अत्यंत टोकाचे बनत चालले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवाराला जवळ केल्याने महाविकास आघाडीला उमेदवारीचा शोध घ्यावा लागणार आहे. तत्पूर्वी महायुतीमधील दोन दिग्गज एकमेकांना भिडले आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे यांनी एकमेकांविरोधात शब्द ठोकला आहे. पण राजकीय डावपेच आखत शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांना पालकमंत्री मुश्रीफ यांनी जवळ केले आहे. त्यामुळे मंत्री मुश्रीफांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. तर स्थानिक भाजप नेत्यांना विरोध करत शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी भाजप नेत्यांना विरोध करण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांचा आणखीन विजय सोपा झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे आता एकाकी पडल्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार समरजित घाटगे (Samarjit Singh Ghatage) यांनी मंत्री मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. मागील विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी लढत झाल्यास घाटगे यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण ऐनवेळी माजी आमदार संजय घाटगे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर मत विभाजणीचा फटका समरजित घाटगे यांना बसला होता. आगामी निवडणुकीत मात्र संजय घाटगे यांनी माघार घेत थेट मुश्रीफ यांनाच पाठिंबा दिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

तर कागल मधील शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक (Sanjay mandlik) ही कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र मंडलिक यांनी यापूर्वीच आपण महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी असेल असे सुतवाच केले होते. नुकताच कागल विधानसभा मतदारसंघातील बिद्री येथे मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आणि माजी खासदार मंडलिक यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी आपण कुणाला पाठिंबा देणार याबाबत वेगळं सांगायची गरज नाही. आपण महायुतीच्या उमेदवारासोबतच आहे. असे संकेत माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महायुतीचे संभाव्य उमेदवार मुश्रीफ यांनाच समजले जाते. त्यामुळे मंडलिक देखील हे मुश्रीफ यांच्याच बाजूने उभे राहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक यांना मंत्री मुश्रीफ आणि भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी देखील पाठिंबा दिला होता. मात्र अपेक्षेप्रमाणे मताधिक्य न मिळाल्याचा आरोप मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ आणि घाटगे गटावर ठेवला होता. मात्र मंडलिक यांच्यासाठी घाटगे आणि मुश्रीफ यांनी देखील ठिकठिकाणी मेळावे घेत मंडलिक यांना मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले होते. आता मंडलिक यांनी मुश्रीफ यांनाच पाठिंबा देण्याचे संकेत दिल्यानंतर घाटगे गट एकाकी पडला आहे. त्यामुळे घाटगे गट नेमकी आता भूमिका काय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT