Shiv Sarvekshan Abhiyan : शिवसेनेच्या शिवसर्व्हेक्षण अभियानात दडलंय काय? अंबादास दानवे घेणार सोलापूरचा आढावा

Ambadas Danve Solapur Tour : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यात शिवसर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्या सोलापूर जिल्हा आणि शहरात येत आहेत.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 August : आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्षाकडून जोमाने सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने यात्रा, मेळावे, सर्वेक्षण, विभागीय मेळावे आदींच्या माध्यमातून मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यात शिवसर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्या (ता. 17 ऑगस्ट) सोलापूर जिल्हा आणि शहरात येत आहेत. सोलापूरच्या शिवसर्व्हेक्षण अहवालात नेमकं काय आहे, याची उत्सुकता असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तयारीचा एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसर्व्हेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. त्या अभियानाचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या सर्व्हेक्षणात पक्षाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण किती, प्रतिकूल परिस्थिती कोणत्या मतदारसंघात आहे, याची चाचपणी केली जाणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माढा (Madha) आणि सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा दानवे घेणार आहेत. मतदारसंघातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून उमेदवारीसंदर्भात, महाविकास आघाडीत सुटू शकणारे संभाव्य मतदारसंघ याचीही चाचपणी या वेळी दानवे करण्याची शक्यता आहे.

Ambadas Danve
Madha Assembly Constituency : अभिजीत पाटलांचे राजकीय सिबिल खराब; संजय कोकाटेंचा टोला

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उद्या सकाळी सहा वाजता सोलापुरात रेल्वेने येणार आहेत. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात थांबून ते सकाळी साडेदहाला पंढरपूरमध्ये पंढरपूर, सांगोला, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. करमाळा, माढा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक ते दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घेणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत दुपारी दीड वाजता अंबादास दानवे हे पंढरपूरमध्ये चर्चा करणार आहेत. मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी चारच्या सुमारास मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत दानवे बैठक घेणार आहेत.

Ambadas Danve
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे वरळी सोडणार, मुंबईतील सुरक्षित ‘या’ मतदारसंघावर डोळा; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांबरोबर सोलापूर शहरातील शिवस्मारक सभागृहात सायंकाळी सहा वाजता चर्चा करणार आहेत. या मतदारसंघातील शिवसेना पक्षाचा आढावा ते घेतील. त्यानंतर रात्री आठनंतर ते तुळजापूरला जाणार आहेत.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com