Vinay Kore And Cm Shinde: महायुतीतील एक खासदार 'जनसुराज्य'ने दिलाय, हे लक्षात ठेवा; आमदार कोरेंनी मुख्यमंत्र्यांना ठणकावले

Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्ह्यातील चार जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला मिळाल्याचं पाहिजेत. करवीर, पन्हाळा - शाहूवाडी, हातकणंगले, चंदगड या मतदारसंघावर कोरे यांनी दावा करत, विधानसभा निवडणुकीसाठी महायुती मध्ये आम्ही 15 जागांची मागणी केली आहे.
Vinay Kore
Vinay KoreSrkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : पन्हाळा परिसरात जनसुराज्यचा पराभव देशातला नाही तर परदेशात ला कोणताही पक्ष करू शकत नाही. करवीर विधानसभा मतदारसंघाचा येणारा आमदार जनसुराज्य शक्ती पक्षाचा असेल. महायुतीमध्ये आम्हाला सन्मानाने जागा द्या. महायुतीतील सातमधला एक खासदार तुम्हाला जनसुराज्य शक्ती पक्षाने दिला आहे हे लक्षात ठेवा. या शब्दात आमदार विनय कोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठणकावले आहे. गगनबावडा येथे गुरुवारी (ता.15) झालेल्या मेळाव्यात त्यांनी हे विधान केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चार जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला मिळाल्याचं पाहिजेत. करवीर, पन्हाळा - शाहूवाडी, हातकणंगले, चंदगड या मतदारसंघावर कोरे यांनी दावा करत, विधानसभा निवडणुकीसाठी महायुती मध्ये आम्ही 15 जागांची मागणी केली आहे. कोल्हापूरच्या चार जागांसोबतच सांगली सोलापूर आणि अन्य जिल्ह्यातील जागा लढावण्याची तयारी आम्ही केली आहेत.

आम्ही जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपचां घटकपक्ष आहोत. महाविकस आघाडीवेळी आम्हाला सोबत येण्याचा प्रस्ताव दिला गेला होता. मात्र, भाजपची साथ सोडली नाही. आम्हाला तरी भाजपकडून वेगळी वागणूक मिळाली नाही. इतर छोट्या घटक पक्षाचं मला माहित नाही. जन सुराज्य शक्ती पक्ष 2004 पेक्षा वेगाने मोठा झालेला या निवडणुकीत दिसेल, असा विश्वास आमदार कोरे यांनी व्यक्त केला.

करवीरमधून आमदार होणाऱ्या व्यक्तीने जिल्ह्यात या मतदारसंघाचं नाव घेतलं जावं असं काम कधी केल का? करवीर विधानसभा मतदारसंघातून संताजी घोरपडे यांना आपण समोर आणायचा आहे. जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये कार्यकर्त्याचा फक्त वापर कधी झाला आहे का? असा सवाल कोरे यांनी करत 2009 ला धामणी धरणासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन प्रयत्न केले आणि परवानगी आणली. पण 2009 पासून आतापर्यंत धामणी धरण पूर्ण होऊ शकलं नाही. याला कोण जबाबदार आहे असा सवालही कोरे यांनी यावेळी केला.

Vinay Kore
Mahant Ramgiri Maharaj : वादग्रस्त वक्तव्य,गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव; रामगिरी महाराजांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

पंधरा वर्षात आपण ज्यांना आमदार केलं, त्यांनी आपल्यासाठी काय केलं याचा विचार करा. मी एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे. असं सांगत आता कोणीतरी येईल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर काही वर्षांनी तुम्ही आला आहात. मात्र, महविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी जो संघर्ष केला त्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबरच जनसुराज्य पक्षही आघाडीवर होता, असा टोला माजी आमदार नरके यांना कोरे यांनी लगावला.

Vinay Kore
Ashish Shelar Vs Shiv Sena Thackeray Party : मुख्‍यमंत्री पद अन् ठाकरेंचं 'तारे जमी पर'; आशिष शेलारांनी टायमिंग साधलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com