Krishna Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

krishna Patil : हातात फक्त काठी अन् अंगावर खाकी... थेट बिबट्याला भिडले : अंमलदार कृष्णा पाटील यांनी सांगितला थरारक प्रसंग

Leopard attack Maharashtra News : शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीत असलेल्या शासकीय विश्रामगृहावर मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सरकारनामा ब्युरो

Kolhapur News : कोल्हापूर शहरात एकीकडे मंगळवारी सकाळपासूनच महापालिका निवडणुकीसाठीच्या आरक्षण सोडतीची लगबग शासकीय विश्रामगृहात सुरू होती. त्यामुळे शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीत असलेल्या शासकीय विश्रामगृहावर मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. येथून जवळच असलेल्या नागाळा पार्कात दुपारी बाराच्या सुमारास बिबट्या आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी येथील कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली.

पोलिस अंमलदार कृष्णा पाटील काही सहकाऱ्यांसोबत वुडलॅंड हॉटेलच्या पिछाडीस पोहोचले. यावेळी त्यांनी नागरीकांनी घराबाहेर पडू नये, अशा सुचना करत शेजारील इमारतीखाली पोहोचले. इतक्यात समोरून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावरच हल्ला केला. बलदंड शरीरयष्टीचे कृष्णा पाटील डगमगले नाहीत. हातातील काठीने त्यांनी बिबट्याची दोन हात करीत वेळीच त्यांनी बिबट्याला मानवीवस्तीपासून हुसकावल्याने कृष्णा पाटील यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नागाळा पार्कात दुपारच्या सुमारास बिबट्या आल्याची माहिती पोलिस निरीक्षक डोके यांनी अंमलदार कृष्णा पाटील यांना दिली. यावेळी काही सहकाऱ्यांसोबत ते वुडलॅंड हॉटेलच्या पिछाडीस पोहोचले. बिबट्या आल्याने नागरीकांनी घराबाहेर पडू नये, अशा सुचना करत ते शेजारील इमारतीखाली पोहोचले. इतक्यास समोरून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावरच हल्ला केला. बलदंड शरीरयष्टीचे पाटील डगमलगले नाहीत.

हातातील काठीने त्यांनी बिबट्याची दोन हात केले. झटापटीत ते खाली कोसळल्याने बिबट्याचा पंजा छातीवर, दंडावर लागून जखमी झाले. वेळीच त्यांनी बिबट्याला मानवीवस्तीपासून हुसकावल्याने तो इमारतीमागील अडगळीच्या ठिकाणी गेला. तिथे एका पाण्याच्या बंद पडलेल्या टाकीत बिबट्याला पकडण्यात यश आले.

‘घराबाहेर पडू नका...इतक्यात’

पोलिस अंमलदार कृष्णा पाटील आणि सहकारी पोलिस आसपासच्या इमारतीत जाऊन नागरीकांना घराबाहेर पडू नका अशा सुचना करीत होते. काही इमारतींचे प्रवेशद्वार बंद करुन परतत असताना एका इमारतीच्या बेसमेंटमध्येच बिबट्या आला. अंमलदार कृष्णा पाटील यांनी बिबट्याला पाहून सावध पवित्रा घेतला. इतक्यात त्यांच्या अंगावर त्याने झडप घेतली.

असा केला बिबट्याचा सामना....

कृष्णा पाटील यांची शरीरयष्टी बलदंड आहे. सैन्यातून सेवानिवृत्त झाल्याने ते पोलिस विभागात रुजू झाले आहेत. हातात केवळ काठी असतानाही त्यांनी थेट बिबट्याची दोन हात केले. झटापटीत ते तोल जाऊन पडले. पण काठी व लाथ मारून त्यांनी बिबट्याला मानवी वस्तीकडे येण्यापासून हुसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर हल्ला करून तो इमारतीच्या पिछाडीस असलेल्या अडगळीच्या ठिकाणी पोहोचला. याच ठिकाणी त्याला पकडण्यात यश आले.

पोलिस निरीक्षक डोके यांनी अंमलदार कृष्णा पाटील, चंद्रशेखर लंबे, सरदार दिंडे, इंद्रजित भोसले, अरुण कारंडे यांना सोबत घेऊन हा परिसर गाठला. बघ्याची गर्दी जमू लागल्याने पोलिसांनी अनेकांना येथून बाजूला करत वनविभागाला सहाकार्य करीत होते.

पोलिस पथकाचे केले कौतुक

पोलीस निरीक्षक संतोष डोके हे कृष्णा पाटील यांच्यासह सहा कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले होते. मानवी वस्तीत आलेला बिबट्या आक्रमक असल्याने त्यांनी पुढाकार घेत नागरीकांच्या रक्षणाचा पवित्रा अवलंबला. प्रसंगावधानता व कमी वेळेत गर्दीवर नियंत्रण आणत दाखवलेल्या धाडसाची सर्वत्र होत आहे. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, उपअधीक्षक प्रिया पाटील, गृह उपअधीक्षक तानाजी सावंत यांनीही पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT