Shivsena Politics: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात विजय करंजकर हेच सबकुछ; महायुतीची वाट न पाहताच स्वबळावर जाहीर केली नगराध्यक्षांची उमेदवारी !

Shiv Sena stronghold News : भगूर नगरपालिकेत महायुतीची चर्चाही नाही, शिवसेना शिंदे पक्षाची स्वबळाची घोषणा
Vijay Karnjakar
vijay Karanjkar Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Shinde News : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतीय जनता पक्ष हे एक हिंदुत्वाचे राजकीय समीकरण आहे. त्या दृष्टीने भगूर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याची इच्छा जाहीर केली आहे. मात्र, ती प्रत्यक्षात येईल का? हा चर्चेचा विषय आहे. भगूर नगरपालिकेत गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाचे विजय करंजकर यांनी एक हाती सत्ता काबीज केली आहे. यंदाही एकदाच शिंदे पक्षातर्फे त्यांनी स्वबळावर तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी महायुती होणार की नाही याचीही वाट पाहिली नाही.

शिवसेना (Shivsena) शिंदे पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. नगराध्यक्ष पदासाठी अनिता करंजकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. पक्षाने याबाबतचे सर्व निर्णय माजी नगराध्यक्ष विजय करंजकर यांच्यावर सोपविले आहेत. शिवसेना शिंदे पक्ष आत्मविश्वासाने कामाला लागला आहे. त्या तुलनेत भाजप मात्र चाचपडताना दिसतो. पक्षात नुकतेच प्रवेश केलेले दीपक बलकवडे हा एकमेव आश्वासक चेहरा भाजपकडे आहे.

Vijay Karnjakar
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर पाळत? 'मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या; मुंबई पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

महायुतीच्या भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे अद्यापही नेमके धोरण दिसत नाही. आमदार सरोज अहिरे यांनी याबाबत बैठक घेऊन चाचपणी केली आहे. भाजप अथवा कोणाशी युती करावी याचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. शिवसेनेच्या विजय करंजकर यांनी प्रत्येक प्रभागात उमेदवार निश्चित केले आहेत. यातील बहुतांशी विद्यमान नगरसेवक आहेत. त्या तुलनेत महाविकास आघाडी अथवा महायुतीच्या अन्य घटक पक्षांकडे धोरण आणि उमेदवार दोन्हींचा दुष्काळ जाणवत आहे.

Vijay Karnjakar
Pune BJP : पुणे पालिकेच्या 165 जागांसाठी भाजपमध्ये 1000 इच्छुक, उमेदवारी निश्चितीसाठी अशी लागणार कात्री, 50 टक्के दिग्गजांचे पत्ते कट होणार

भाजपची निवडणूक जबाबदारी असलेले आमदार डॉ. राहुल आहेर यांनी शनिवारी एकच दिवसात सर्व नगरपालिकांचा दौरा केला. इच्छुकांची चर्चा करून याबाबतचा अहवाल तयार केला आहे. उद्या सकाळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत बैठक होईल.

Vijay Karnjakar
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौरा संपवताच ओमराजेंवर दिली मोठी जबाबदारी

या बैठकीत भाजपचे निवडणूक धोरण ठरणार आहे. भाजप काय निर्णय घेतो यावर भगूर नगरपालिकेच्या राजकारणावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपला यंदा तरी भगूर नगरपालिकेवर सत्ता मिळविणे सोपे दिसत नाही. त्यामुळे चाचपडणारी महाविकास आघाडी आणि विस्कळीत महायुती अशा स्थितीत भगूर नगरपालिकेचे राजकारण कोणत्या कुशीला वळते, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

Vijay Karnjakar
NCP warning to BJP : 'वाटेला गेला तर, विधानसभा सभागृहात देखील...'; भाजपच्या पडळकरांना अजितदादांच्या शिलेदारानं थेट सुनावलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com