Chandrakant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil News : "सोलापूर थोडं, तर माढा जिंकणं जास्त कठीण"; पाटलांनी वाढवलं महायुतीचं टेन्शन

Chandrakant Patil Solapur Lok Sabha Constituency : चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होते.

Akshay Sabale

सोलापूर आणि माढ्यातील लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते ( Ram Satpute ) आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांच्यात, तर माढ्यात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjisinha Naik Nimbalkar ) आणि नुकतंच भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेलेल्या धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) यांच्यात कडवी झुंज होत आहे. यातच मंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी केलेल्या विधानानं महायुतीचं टेन्शन वाढलं आहे.

भाजपसाठी सोलापूर लोकसभेची निवडणूक ( Solapur Lok Sabha Election 2024 ) थोडीशी कठीण आणि माढ्याची ( Madha Lok Sabha Election 2024 ) जरा जास्त कठीण असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी केलं आहे. तसेच, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही चंद्रकांत पाटलांनी केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा शहरात चंद्रकांत पाटील यांनी आमदार समाधान आवताडे आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे ( Laxman Dhobale ) यांच्यासह कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर सोलापूर शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी आयोजित केलेल्या बैठकीला चंद्रकांत पाटलांनी हजेरी लावली.

या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, "सोलापूरची निवडणूक थोडीशी कठीण आहे. माढ्याची निवडणूक यापूर्वी कठीण नव्हती. मात्र, आता ती कठीण झाल्याचं वाटत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची कामाला लागावे. महाराष्ट्रात महायुतीला 45 पेक्षा एकाही जागा कमी मिळणार नाही. ज्या तीन जागा अडचणीच्या वाटतात, त्यादेखील मिळवण्याचा प्रयत्न करू."

दरम्यान, भाजपनं माढ्यातून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा तिकीट दिल्यानंतर अकलूजचे मोहिते-पाटील नाराज झाले होते. धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, निंबाळकर यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर मोहिते-पाटलांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. लागलीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे माढ्यात मोहिते-पाटील विरुद्ध नाईक-निंबाळकर, अशी रंगतदार लढाई होणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT