Laxman Dhoble News : उमेदवारीत डावलेल्या ढोबळेंना फलकांवरही स्थान मिळेना; नाराज समर्थकाने दिला भाजपचा राजीनामा

Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षात लक्ष्मण ढोबळे यांना डावलले जात आहे, अशी तक्रार करत प्रकाश खंदारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष चांगदेव कांबळे यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे भाजप माजी मंत्री असलेल्या ढोबळेंना सन्मानाने वागणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
Laxman Dhoble
Laxman DhobleSarkarnama

Mangalvedha, 16 April : सोलापूर लोकसभेसाठी इच्छूक असलेल्या लक्ष्मण ढोबळे यांच्याबाबत भारतीय जनता पक्षाने थोडीही उत्सुकता दाखवली नाही. पण महायुतीच्या प्रचाराचा फलकांवरही प्रवक्ते असलेल्या ढोबळेंचा फोटोही वापरला जात नाही. त्यामुळे ढोबळे यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खंदारे यांनी याबाबतची तक्रार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची केली आहे. तसेच, आपल्या पदाचा राजीनामा आघाडीच्या जिल्हाध्यक्षांकडे दिला आहे. मंगळेवढ्यात निर्णायक असलेल्या ढोबळे समर्थकांची नाराजी भाजपला अडचणीची ठरू शकते.

यासंदर्भात भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खंदारे यांनी निवेदन पाठवले आहे. त्या निवेदनात खंदारे यांनी म्हटले आहे की, बहुजन रयत परिषद आणि शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे जिल्ह्यात संपर्क आहे. ते वीस वर्षे आमदार होते आणि मंत्रीही होते. त्यांना पक्षाने प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र, पक्षाच्या फलकांवर, फ्लेक्स आणि होर्डिंग्जवर प्रवक्ते ढोबळे (Laxman Dhoble) यांना स्थान दिले जात नाही. याउलट एकदा आमदार असलेल्या लोकांना त्या फलकांवर संधी मिळते, अशी खंतही खंदारे यांनी मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Laxman Dhoble
Sharad Pawar News : लेकीसाठी आठ, धैर्यशीलसाठी सहा, लाडक्या शशिकांतसाठी पाच; पवारांचा झंझावात!

भारतीय जनता पक्षात लक्ष्मण ढोबळे यांना डावलले जात आहे, अशी तक्रार करत प्रकाश खंदारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष चांगदेव कांबळे यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे भाजप माजी मंत्री असलेल्या ढोबळेंना सन्मानाने वागणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

लक्ष्मण ढोबळे यांचे सुपुत्र अभिजीत ढोबळे यांनी दोनच दिवसांपूर्वी सोलापूर लोकसभेतील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा दर्शविला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पाच आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते पक्षाला मिळाले आहेत, त्यामुळे काही भाजप कार्यकर्त्यांची भावना लोकसभेची निवडणूक आपल्या हातात असल्याची झाली आहे. त्यामुळे माजी मंत्री असलेल्या ढोबळे यांना डावलले जात आहे, अशी नाराजी खंदारे यांनी व्यक्त केली आहे.

Laxman Dhoble
Lok sabha Election 2024 : फडणवीसांची आडम मास्तरांवर टीका; ‘त्यांनी कोणालाही पाठिंबा दिला तरी कामगार मोदींनाच मते देतील'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com