ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mohite Patil News : "फलटणमधून कंटेनर भरून माढ्यात येत आहेत, अजिबात रूपया सोडायचा नाही, पण..."

Akshay Sabale

Solapur News, 5 May : गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघात ( Madha Lok Sabha Constituency ) हायव्होल्टेज ड्रामा रंगला आहे. मोहिते-पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात तू-तू मैं-मैं सुरू होती. पण, रविवारी ( 5 मे ) प्रचाराच्या तोफा थंडवणार असून रात्रीत गणिते बदलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

"फलटणमधून कंटेनरच्या कंटेनर भरून आले आहेत. माढ्यात सुद्धा येतील. अजितबात एक रूपयाचा सोडायचा नाही. पण, आपल्याला तुतारी वाजवायची आहे," असं विधान धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) यांनी केलं आहे. एक प्रकारे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी खासदार निंबाळकर यांना लक्ष्य केलं आहे. ते एका सभेत बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, "भाजपची राज्यातील एकच, म्हणजे नितीन गडकरी यांची जागा जिंकून येणार आहे. तेही गडकरी काम करतात म्हणून निवडून येतील. बाकी सगळीकडे भाजपचा सुपडा साफ होणार आहे."

"फलटणमधून कंटेनरच्या कंटेनर भरून आले आहेत. हळू-हळू माढ्याकडे येतील. मला कळलं की, गाड्या माढ्याच्या दिशेने निघाल्या आहेत. अजिबात एक रूपया सोडायचा नाही. मात्र, आपल्याला तुतारी वाजवायची आहे. ही लढाई तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी लढत आहे. माझ्यासाठी नाही," असं धैर्यशील मोहिते-पाटील यांनी म्हटलं आहे.

"भाजपबरोबर असताना आम्ही गुन्हेगार नव्हतो. आता आम्हाला गुन्हेगार ठरवलं जात आहे. आम्ही गुन्हेगार आहोत की नाही, हे माळशिरस, सोलापूर, माढ्यातील जनतेला चांगलं माहिती आहे. आमचा कारभार स्वच्छ आहे. कुठलीही संस्था चालवताना चढ-उतार येत असतात. त्याला आम्ही जबाबदार आहोत. लोकांना तोंड देत आहे," असंही धैर्यशील मोहिते-पाटील यांनी स्षष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT