Dhairyasheel Mohite Patil News : 'आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आली होती'; धैर्यशील मोहिते-पाटलांचा निंबाळकरांवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकर आणि प्रणिती शिंदेंनी राम सातपुते यांच्यावर निशाणा साधला.
 ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patil
ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patilsarkarnama

2019 मध्ये माढा मतदारसंघातून ( Madha Lok Sabha Election 2024 ) रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsingh Naik Nimbalkar ) यांना भाजपनं उमेदवारी दिली होती. तेव्हा, मोहिते-पाटील कुटुंबानं आपली सगळी ताकद रणजितसिंह निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी लावली. पण, 2024 मध्ये धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढ्यातून लढण्याची तयारी दर्शवली. निंबाळकरांवर पुन्हा भाजपनं विश्वास दाखविल्यानं मोहिते-पाटील यांनी 'तुतारी' हाती घेतली आहे. मात्र, आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आली होती. ती चूक आम्ही करून बसलो, असं म्हणत धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रणजतिसिंह निंबाळकरांवर निशाणा साधला आहे.

सोलापूर ( Solapur ) आणि माढा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीची पंढरपुरात ( Pandharpur ) सभा पार पडली. या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ), काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ), उत्तम जानकर ( Uttamrao Jankar ) आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. या वेळी धैर्यशील मोहिते-पाटलांनी ( Dhairyasheel Mohite Patil ) एक किस्सा सांगत निंबाळकरांना लक्ष्य केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, "पाच वर्षांपूर्वी निवडणुकीच्या धामधूमीआधी इथं जत्रा भरली होती. त्या जत्रेत एकानं तंबू लावला होता. त्याबाहेर बोर्ड लिहिला, एक रुपयात रुपया घ्यायचा आणि आता जाणाऱ्याला सांगायचा की, आता जर तुला दोन गाढव दिसले आणि तू बाहेर की, मला गाढव दिसले, तर पुढील जुन्मी तू गाढव होणार आहे."

"अशी परिस्थिती माढा आणि सोलापूर लोकसभेची झाली होती. आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आली होती. ती चूक आम्ही करून बसलो," असं धैर्यशील मोहिते-पाटील यांनी म्हटलं.

 ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patil
Shahajibapu Patil News : "अकलूजला रावणं जन्माला आली आणि आमच्या उरावर बसली", शहाजीबापूंची मोहिते-पाटलांवर जहरी टीका

या वेळी प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर टीका केली आहे. "सोलापूर 10 वर्षे मागे गेलं आहे. हे भाजपचं पाप आहे. दोन-दोन खासदार निवडले. पण, कामाच्या पाट्या कोऱ्या आहेत. अनुभव नसताना जनतेनं निवडून आणलं. दोघांनीही खासदारकी वाया घालवली. लोकसभेत एकदा पण बोलले नाहीत. त्यांच्याच पक्षानं त्यांना निष्क्रीय असल्याची पावती दिली. पंतप्रधान असूनसुद्धा तीन-तीन वेळा उमेदवार बदलावे लागतात. ही शोकांतिका आहे. पहिला उमेदवार आणला तो बदलला. दुसरा बदलला आता उपरा आणला," असा शब्दांत प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंवर टीकास्र डागलं आहे.

R

 ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patil
Uttam Jankar News : उत्तम जानकरांचा शहाजीबापूंवर पलटवार; 'सुपारी फुटली, हळद लागली आता...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com