Ranjeetsingh Nimbalkar News : खासदार निंबाळकरांनी मोहिते-पाटलांच्या मुळावरच घाव घातला; रणजितसिंह यांच्यावरही बसरले

Ranjeetsingh Nimbalkar On Vijaysinh Mohite Patil : "विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशिवाय जिल्ह्यात पान हालत नव्हतं, आता..."
Ranjeetsingh Naik Nimbalkar Ranjitsinh Mohite Patil
Ranjeetsingh Naik Nimbalkar Ranjitsinh Mohite Patil sarkarnama
Published on
Updated on

माढा लोकसभा मतदारसंघाची ( Madha Lok Sabha Constituency ) निवडणूक यंदा रंगतदार झाली आहे. धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) विरुद्ध रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील लढाईमुळे राजकीय वातावरण तापलं होतं. यातून भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील अलिप्त राहिले होते. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी 'तुतारी' हाती घेण्यापूर्वीच रणजितसिंह हे भाजपबरोबर राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि खासदार निंबाळकर यांच्याकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना लक्ष्य करण्यात येत होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढा लोकसभा मतदारसंघाची ( Madha Lok Sabha Constituency ) निवडणूक यंदा रंगतदार झाली आहे. धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) विरुद्ध रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यातील लढाईमुळे राजकीय वातावरण तापलं होतं. यातून भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील अलिप्त राहिले होते. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी 'तुतारी' हाती घेण्यापूर्वीच रणजितसिंह हे भाजपबरोबर राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि खासदार निंबाळकर यांच्याकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना लक्ष्य करण्यात येत होतं.

आता निंबाळकर यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील ( Ranjitsinh Mohite Patil ) यांच्यावर निशाणा साधला आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील खासदार, आमदार होते. पण, रेल्वे आणि नीरेच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही. जिल्हा बँकेत चेअरमन असताना हजारो कोटींचा घोटाळा झाला, असा आरोपही खासदार निंबाळकर ( Ranjeetsingh Nimbalkar ) यांनी केला आहे. ते एका युट्युब चॅनेलशी संवाद साधत होते.

खासदार निंबाळकर म्हणाले, "रणजितसिंह मोहिते-पाटील हे कधीही कोषातून बाहेर पडले नाहीत. पुणे, मुंबईतील कॅफेत बसणं ही त्यांची संस्कृती आहे. माळशिरसमधील एखाद्या गावात सोडलं आणि एकट्याला घरी या म्हटलं, तरी रणजितसिंह येऊ शकत नाहीत. माळशिरस तालुक्याशी त्यांना घेणं देणं नाही. तालुक्याबद्दल लगाव नाही. खासदार, विधानपरिषदेचे सदस्य झाले, तरी रेल्वे आणि नीरा-देवघर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. मी ते काम केलं. यातील एक काम जरी केल असतं, तर विजयसिंह मोहिते-पाटील कुटुंबावर ही वेळ आली नसती, सतत पक्ष बदलावे लागले नसते."

Ranjeetsingh Naik Nimbalkar Ranjitsinh Mohite Patil
Vijaysingh Mohite Patil : 'शरद पवारांनी आपल्या चुका पदरात घेतल्या; आता...'

"मोहिते-पाटील कुटुंबातील मुलांनी संस्था बुडवल्या. याबद्दल जनतेत नैराश्य आहे. पैसे खासगी आयुष्यासाठी वापरले. लोकांची लग्न आणि मुलांचं शिक्षण थांबली आहेत. जिल्हा बँकेचे चेअरमन असताना हजारो कोटींचा घोटाळा झाला. त्या बँकेची चौकशी लागली असून तिथे प्राशासक नेमलं आहे. यांनी मातीत उतरून कधी काम केलं नाही," असा हल्लाबोल खासदार निंबाळकरांनी केला आहे.

"मिळालेलं गबाळ घ्यायचं आणि मुंबईला जायचं, अशी संस्कृती मोहिते-पाटील कुटुंबात रंगली आहे. माळशिरससह सोलापूर जिल्ह्यात यांच्याबद्दल आक्रोश आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशिवाय जिल्ह्यात पान हालत नव्हतं. आता मोहिते-पाटील कुटुंबाच्या विरोधात सगळे आमदार आहेत," असंही खासदार निंबाळकर यांनी सांगितलं.

Ranjeetsingh Naik Nimbalkar Ranjitsinh Mohite Patil
Uttam Jankar News : "सब कुछ जल गया है, अब बचा ही क्या है; शरद पवार आप है तो जलाही क्या है,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com